न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. भारताने बंगळुरुतील पहिला कसोटी सामना 8 विकेट्सने गमावला होता आणि आता पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा फलंदाज विराट कोहली सपशेल फ्लॉप ठरला. भारताच्या दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहलीला राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहली फलंदाजीला आला तेव्हा त्याने काही चांगले फटके मारून विजयाची आशा निर्माण केली. पण बाद झाल्यावर जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा त्याचा राग शिगेला पोहोचला. रागाच्या भरात त्याने बॅटने पाण्याच्या बाटल्या आणि बर्फ ठेवलेल्या बॉक्सवर आपटले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कोहली बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तेव्हा काही चाहत्यांनी ‘हार्ड लक’ म्हटले. त्यानंतर कोहलीने आपल्या बॅटने पाण्याच्या बाटल्यांनी भरलेल्या बॉक्सवर जोरदार प्रहार केला. पुणे कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने केवळ एक धाव घेतली होती, तर दुसऱ्या डावात तो केवळ 17 धावांचे योगदान देऊ शकला.
Dear bro Virat Kohli, The bat is hit over the ball, not over this water box.🤬 #INDvNZ pic.twitter.com/FZshuZIkzL
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 26, 2024
दरम्यान पुणे कसोटीतील पराभवासह भारतीय संघानं 0-2 अशा फरकाने मालिकाही गमावली आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळला गेला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 8 विकेटनं पराभव झाला होता. न्यूझीलंड संघानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता त्यांनी पुणे कसोटीही जिंकून इतिहास रचला आहे. या पराभवासह भारतानं तबब्ल 12 वर्षांनंतर तसेच 4331 दिवसांनंतर घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे.
हेही वाचा –
“प्रत्येक सामना अश्विन आणि जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही”, कर्णधार रोहितकडून अष्टपैलूंची पाठराखण
टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने
न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या