---Advertisement---

Video: अशी दिसते विरुष्काची लाडकी लेक, बाबा विराटने विनंती केल्यानंतरही वामिकाचा चेहरा कॅमेरात कैद

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 5:14 PM
Vamika-First-Look
---Advertisement---

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) संपूर्ण संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी गुरुवारी (१६ डिसेंबर) रवाना झाला. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान विराट कोहलीची मुलगी वामिकाची थोडीशी झलक पाहायला मिळाली. वामिकाचा चेहरा आतापर्यंत चाहत्यांना पाहायला मिळाला नव्हता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडप्याने आतापर्यंत त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर येऊ दिला नव्हता. भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना होताना देखील विराट आणि अनुष्काचे प्रयत्न होते की, वामिकाचा चेहरा दिसू नये. अनुष्का वामिकाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती आणि विराट फोटो न काढण्याची विनंती करत होता. परंतु यावेळी वामिकाचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विराट आणि अनुष्का नेहमीच त्यांच्या मुलीचा चेहरा लपवत आले आहेत. ११ जानेवारीला वामिकाचा पहिला वाढदिवस होता, पण तेव्हासुद्धा या दोघांनी मुलीचा एकही फोटो शेअर केला नव्हता. तसेच इतर कोणत्या मार्गाने देखील वामिकाचा चेहरा अद्याप समोर येऊ शकला नव्हता. आता पहिल्यांदाच चाहत्यांना विराट आणि अनुष्काच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळाला.

https://www.instagram.com/reel/CXh5iHIKDbU/?utm_source=ig_web_button_share_sheet

जेव्हा वामिकाचा जन्म झाला होता, तेव्हा विराटने सोशल मीडियावर स्वतः पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली होती. परंतु विराटने यावेळी मुलीचा फोटो शेअर करणे टाळले होते. त्याने फक्त लेखी पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये विराटने लिहिले होते की, “आम्हा दोघांना हे सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या ईथे मुलगी झाली आहे. आम्ही तुमचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आम्हाला माहिती आहे की, तुम्ही हे नक्की समजून घ्याल की, यावेळी सर्वांना थोडी प्रायवसी हवी असते.”

काही दिवसांपूर्वी लाइव सेशनदरम्यान विराटला प्रश्न विचारला गेला होता की, त्यांना वामिकाला अजूनपर्यंत सोशल मीडियापासून लांब का ठेवले आहे? याचे उत्तर देताना विराट म्हणाला होता की, “एक जोडपे म्हणून आम्ही ठरवले आहे की, आम्ही आमच्या मुलीला तोपर्यंत समोर आणणार नाही, जोपर्यंत तिला सोशल मीडिया आणि स्वतःच्या आवडी निवडीविषयी कळणार नाही.” यावेळी एका चाहत्याने वामिकाच्या नावाचा अर्थ विचारल्यावर विराटने हे मा दुर्गाचे संस्कृत नाव असल्याचे सांगितले होते.

महत्वाच्या बतम्या –

थोडं नशीब थोडी मेहनत! ४ वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथ झाला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, ‘हे’ आहे कारण

जरा इकडे पाहा! टी२० मध्ये सहा षटकार खाणाऱ्या ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

अफगाणिस्तान २०१८ नंतर येणार भारतीय दौऱ्यावर, असे आहे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---