---Advertisement---

लहानग्या वामिकाने पहिल्यांदाच अनुष्काला म्हटले ‘मम्मा’; तिचा आवाज ऐकून म्हणाल, ‘किती गोड’!

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 1:47 PM
Virat, Anushka And Vamika
---Advertisement---

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika Kohli)सोबत दक्षिण आफ्रिकेला गेला आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले गेलेले आणि प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. असाच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वामिका तिच्या आईला ‘मम्मा’ (Vamika Called Anushka Mumma) म्हणण्याचा प्रयत्न करत आहे.

चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनुष्का किंवा वामिका दोघेही दिसत नाही,त तरी वामिकाचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. हा व्हिडिओ एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक चाहते याला वर्षातील सर्वोत्तम व्हिडिओंपैकी एक म्हणत आहेत.

विराट-अनुष्काने आपली मुलगी वामिकाला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी आतापर्यंत वामिकाचे बरेचशे फोटो शेअर केले आहेत. पण तिचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली आहे. मीडियालाही अनुष्का आणि विराटने आपल्या मुलीचा फोटो न काढण्याची विनंती केली आहे.

https://www.instagram.com/reel/CYJvU0RvesE/?utm_source=ig_web_button_share_sheet

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपले फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छाही आपल्या चाहत्यांना दिल्या होत्या.

दुसरीकडे भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून इतिहास रचला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे होणार आहे. या मैदानावर भारतीय संघ कधीही हरलेला नाही. वांडरर्स स्टेडियमवर भारताने ५ कसोटी सामने खेळले आहेत. या ५ कसोटी सामन्यांपैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

दुसरी कसोटी जिंकून मालिका जिंकत नवा इतिहास रचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघ आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत पराभूत करू शकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटचे चाणक्य…! ‘हे’ आहेत आशियातील सर्वात बुद्धिमान कर्णधार

निलंबनापासून ते कॅप्टन्सीपर्यंत, फक्त ३ वर्षात राहुलच्या कारकिर्दीला मोठे वळण; वाचा त्याचा प्रवास

स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय संघावर दंड ठोठावल्याने नाराज झाले प्रशिक्षक द्रविड, केले मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---