---Advertisement---

विराट-अनुष्काने टीम इंडियासह नववर्षाचे केले स्वागत, फोटो होतायेत व्हायरल

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 6:11 PM
Virat Kohli and Anushka Sharma
---Advertisement---

एकीकडे देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असूनही सर्वांनी ‘नवीन वर्ष 2022’ चे मोठ्या उत्साहात आणि धमाकेदार पद्धतीने स्वागत केले आहे. जगभरातील लोकांनी फटाक्यांची आतषबाजी करून, काहींनी त्यांच्या मित्रांसह आणि काहींनी त्यांच्या कुटुंबीयांसह घरात राहून नवीन वर्ष 2022 साजरे केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने देखील आपल्या कुटुंबियांसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. यात भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे.

विराटने भारतीय संघातील खेळाडूंबरोबर तसेच त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासह नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले. विराट आणि  अनुष्का या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत पोज देताना दिसत आहे. तसेच, कपलच्या शेजारी एक मोठा केक कापलेला दिसत आहे. यादरम्यान अनुष्का काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तर विराट कोहली पांढरा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाच्या जीन्समध्ये खूप हँडसम दिसत आहे.

फोटो पोस्ट करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ज्या वर्षातून आम्हाला सर्वात मोठा आनंद मिळाला आहे, ते मला माहीत आहे. तर, 2021 चे मनापासून आभार, धन्यवाद!’ अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/CYKWPgNsdhK/

तसेच विराटने फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘आम्हाला आशा आहे की, सर्वांना नव्या वर्षात आनंद मिळेल. तुम्हाला प्रेम आणि सकारात्मकता मिळो, अशा शुभेच्छा.’

2021 खास वर्ष का आहे अनुष्का आणि विराटसाठी?
11 जानेवारी 2021 रोजी विराट आणि अनुष्काला कन्यारत्नचा लाभ झाला होता. पण त्या दोघांनीही आपल्या मुलीला मीडिया पासून दूर ठेवले आहे. तिचा चेहराही अजून दाखवलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

१ जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार स्थान? निवड समीती प्रमुखांनी दिले उत्तर

सर्वकालीन महान प्रशिक्षक काढणार इंग्लडला पराभवाच्या गर्तेतून? प्रशिक्षण देण्याची व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---