नवी दिल्ली। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्याने आपल्या कठोर मेहनतीने मैदानावर केलेले पराक्रम कधीच विसरता येणार नाहीत. विराटने केवळ मैदानावरच नव्हे तर सोशल मीडियावरही आपले नाव गाजवले आहे. विराटने इंस्टाग्रामवरदेखील आता एक मोठे स्थान मिळविले आहे.
सर्वाधिक फॉलोअर्स मिळविणारा पहिला आशियाई
खरं तर विराटच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल ७५.६ मिलियन पेक्षाही अधिक झाली आहे. याबरोबरच तो इंस्टाग्रामवर ७५ मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असणारा आशियाचा पहिला व्यक्ती बनला आहे, तर जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स मिळविणाऱ्यांच्या बाबतीत तो २९ व्या क्रमांकावर आहे.
एकूण फॉलोअर्सची संख्या जवळपास १५० मिलियन
विराटला फेसबुकवर तब्बल ३६.९ मिलियन लोक फॉलो करतात, तर ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही ३७.३ मिलियन इतकी आहे. जर फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामबद्दल बोलायचं झालं, तर विराटच्या एकूण फॉलोअर्सची संख्या ही जवळपास १५० मिलियन झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार विराट इंस्टाग्रामवर जगभरात ४थ्या क्रमांकावरील खेळाडू आहे. तो रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार ज्यूनियरच्या मागे आहे.
फोटो शेअरिंग साईट असणाऱ्या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा सेलिब्रिटी पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याचे २३८ मिलियन फॉलोअर्स आहेत. संगीतकार आणि अभिनेत्री एरियाना ग्रँडे १९९ मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर हॉलिवूडचा सुपरस्टार ड्वेन ‘द रॉक’ जॉनसन १९४ मिलियनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएल २०२० मध्ये आरसीबीचे नेतृत्व करण्यासाठी विराट सज्ज
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला पुढच्या महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होत आहे. आयपीएल २०२०चे आयोजन दुबई, आबू धाबी आणि शारजाहमध्ये होणार असून यातील अंतिम सामना हा १० नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. यादरम्यान विराट आपल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकूण देण्याचा प्रयत्न करेल.
जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने १७७ सामन्यांमध्ये ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-७० शतके ठोकणाऱ्या विराटसाठी ‘हे’ काम नाही कठीण, घ्या जाणून
-आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
-आश्चर्यकारक! खेळपट्टीमध्ये दबला चेंडू, सामन्याला झाला उशीर
ट्रेंडिंग लेख-
-या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
-फक्त ०.०१७ टक्क्यांनी हुकला जेम्स अँडरसनचा जगातील सर्वात मोठा विक्रम
-आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद