यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या 3 सामन्यात फ्लाॅप गेला होता. परंतू टी20 विश्वचषक 2024च्या सुपर 8 च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) 28 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली. परंतु यादरम्यान त्यानं एक मोठा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला. आज (22 जून) कोहली विश्वचषकाच्या स्पर्धेत (एकदिवसीय + टी20) 3000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियमवर चालू असलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) 28 चेंडूत 37 धावा करुन तंबूत परतला. कोहलीनं त्याच्या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याला तन्झिम हसन शाकिबनं क्लीन बोल्ड केले.
विश्वचषकाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा (एकदिवसीय + टी20)
3000 – विराट कोहली*
2637 – रोहित शर्मा
2502 – डेव्हिड वाॅर्नर
2278 – सचिन तेंडुलकर
एकदिवसीय विश्वचषकात कोहलीनं 1795 धावा केल्या आहेत, तर टी20 विश्वचषकात त्यानं 1207 धावा केल्या आहेत. त्याच्या एकदिवसीय आणि टी20 विश्वचषकात एकूण 3002 धावा पूर्ण झाल्या आहेत. 35 वर्षीय कोहलीनं एकदिवसीय विश्वचषकात 37 सामने खेळले आहेत, तर टी20 विश्वचषकात तो 32वा सामना खेळत आहे.
तत्पूर्वी बांग्लादेशनं टाॅस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं बांग्लादेशसमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) 27 सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 5 उत्तुंग षटकार ठोकले. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाला शानदार सुरुवात करुन दिली. विराट कोहलीनं (Virat Kohli) 28 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये 3 गगनचुंबी षटकार ठोकले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 23, शिवम दुबे (Shivam Dube) 34 धावा तर रिषभ पंतनं 24 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी केली. यादरम्यानं 4 चौकांरांसह 2 उत्तुंग षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याचं विस्फोटक अर्धशतक! भारताचं बांग्लादेशसमोर 197 धावांचं आव्हानं
IND vs BAN सामन्यात बांग्लादेशनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
टी20 विश्वचषक सुपर-8 च्या अंतिम टप्यात! जाणून घ्या संपूर्ण संघांची स्थिती, उपांत्य फेरीचे समीकरण