आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या धावा उभारल्या. संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने यादरम्यान अर्धशतकी योगदान दिले. त्याचबरोबर त्याने बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एक विक्रम आपल्या नावे केला.
विराटने आयपीएल 2023 मध्ये पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 82 धावांची नाबाद खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ 21 धावा करता आल्या. मात्र, लखनऊविरुद्ध त्याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. विराटने सलामीला फलंदाजीला उतरत लखनऊच्या गोलंदाजांवर प्रभुत्व ठेवले. त्याने 4 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 35 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे 51 वे आयपीएल अर्धशतक ठरले. बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूवर 61 धावा केल्या. यात प्रत्येकी चार चौकार व चार षटकारांचा समावेश होता.
या अर्धशतकासह विराट चिन्नास्वामी स्टेडियमवर टी20 मध्ये 24 व्या वेळी 50 पेक्षा जास्त धावांची खेळी केली. यामध्ये 21 अर्धशतके व 3 शतकांचा समावेश आहे. याबाबतीत त्याने इंग्लंडचा फलंदाज ऍलेक्स हेल्स याची बरोबरी केली. हेल्स याने इंग्लंडमधील ट्रेंट ब्रिज ठिकाणी 22 अर्धशतके व दोन शतके ठोकली आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी बांगलादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल असून ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर त्याने 19 अर्धशतके व दोन शतके ठोकलीत. त्यानंतर इंग्लंडच्या जेसन रॉय याने ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत 19 अर्धशतकांसह दोन शतके झळकावली आहेत.
(Virat Kohli Become 2nd Batter In T20 Who Hits 24 50 Plus Score On Same Ground Virat Did At Chinnaswamy Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCBvLSG| चिन्नास्वामीवर नाणेफेक सुपरजायंट्सच्या पारड्यात, आरसीबीची प्रथम फलंदाजी
युवा कबड्डी सिरीजमध्ये आकाश शिंदेचं जोरदार आगमन