इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३९ वा सामना रविवार रोजी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने सलामीला फलंदाजी करताना भीमपराक्रम आपल्या नावावर आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे.
मुंबईच्या सर्वात अनुभवी गोलंदाजीपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह याच्या डावातील चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत त्याने या विक्रमास गवसणी घातली आहे. ११ चेंडूंचा सामना करताना १७ धावा काढताच त्याच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे.
कारकिर्दीतील ३१४ व्या टी२० सामन्यात त्याने हा किर्तीमान केला आहे. यादरम्यान तो दिल्ली, भारत, इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून टी२० सामने खेळला आहे. विराटनंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत ३५१ टी२० सामन्यांमध्ये ९३४८ धावा केल्या आहेत. तर सुरेश रैना (८६४९ धावा) आणि शिखर धवन (८६१८) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
जर, एकूण फलंदाजांच्या (भारतीय आणि परदेशी) बाबतीत बोलायचे झाल्यास, ख्रिस गेल, कायरन पोलार्ड हे वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू टॉप-२ स्थानांवर आहेत. गेलने टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १४२७५ धावा चोपल्या आहेत. तर पोलार्ड १११९५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याव्यतिरिक्त शोएब मलिक (१०८०८ धावा) आणि डेविड वॉर्नर (१००१९) हेदेखील विराटच्या पुढे आहेत.
याचबरोबर विराट हा पहिला असा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधे १००१४, अ दर्जाच्या क्रिकेटमधे १३६११ व ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधे १०००४ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिनही प्रकारात १० हजारपेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: धोनीने नेत्रदीपक झेल टिपल्यानंतरही पंचांची टाकला सीएसकेच्या जल्लोषात मिठाचा खडा
डीआरएसनं वाचवलं, पण रायुडूच्या ‘बाज की नजरे’पासून वाचणं लई कठीण बुवा! पाहा शुबमनचा रनआऊट





