भारताचा प्रमुख फलंदाज आणि मजी कर्णधार विराट कोहली याने एक मोठा विक्रम नावावर केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी, 25 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. विराट आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी-20 सामने खेळताना केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामने खेळताना एकूण 8 वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. हा एक विश्वविक्रम ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम डेविड वॉर्नर () याच्या नावावर होता. वॉर्नरने श्रीलंका संघाविरुद्ध एकूण 7 वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. आता वॉर्नर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा विराटचेच नाव आहे. विराटने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध 6 वेळा 50 धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. रोहित शर्मा देखील यादीत सहभागी आहे. रोहितने वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळताना प्रत्येकी 6-6 वेळा 50 पेक्षा मोठी खेळी केली आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक केले. त्याने 48 चेंडूत 63 धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादव (36 चेंडूत 69 धावा) आणि विराटच्या वादळी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 187 धावांचे लक्ष्य गाठले. भारताने चार विकेट्सच्या नुकसानावर आणि 19.4 षटकांमध्ये सामना नाववर केला. मालिकेतील हा भारताचा सलग दुसरा विजय असून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशा अंतराने पराभव स्वीकारला.
मालिकेचा विचार केला, तर मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना नागपूरमध्ये खेळला गेला, असून भारताने यामध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला. रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा 6 विकेट्सच्या अंतराने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारताला आला दक्षिण आफ्रिका संघाशी भिडायचे आहे. आफ्रिकी संघाविरुद्धची टी-20 मालिका 28 सप्टेंबर पासून मायदेशात सुरू होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS | गोलंदाज नाही करू शकले रोहितला खुश, मालिका जिंकल्यानंतर कर्णधार म्हणाला…
ग्रीन-डेव्हिडच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलिया फ्रंटफुटवर! टीम इंडियासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान; अक्षर पुन्हा चमकला
हाताने बेल्स पडूनही मॅक्सवेल बाद! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ