भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला नुकताच २-१ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने तडकाफडकी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्याने सोशल मीडियावरून आपला निर्णय जाहीर केला. (Virat Kohli Resign As Test Captain)
विराटचा तडकाफडकी राजीनामा
विराट कोहली याने कसोटी मालिका गमावल्यानंतर २४ तासाच्या आत आपला राजीनामा दिला. त्याने आपल्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे धन्यवाद मानले. विराटने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडलेले. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी त्याला कर्णधारपदावरून हटविले होते. त्यानंतर आता विराट स्वतः कसोटी कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे.
विराटचृया नेतृत्वात भारतीय संघाने मिळविलेल्या उपलब्धी
विराट कोहली याला भारताचा आजवारचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणता येईल. कारण, त्याच्याच नेतृत्वात भारताने अशा काही गोष्टी मिळवल्या आहेत ज्या यापूर्वी कधीही न मिळविल्या नव्हत्या. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार होण्याचा मान मिळवला होता. त्याच्या नेतृत्वात भारताने २०१८-२०१९ मध्ये कसोटी मालिका जिंकली होती.
याबरोबरच विराट हा इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामने जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ इंग्लंड दौऱ्यावर एक व २०२१ मध्ये दोन कसोटी सामने जिंकले आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवरही त्याच्या नेतृत्वात भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत.
कसोटी कर्णधार म्हणून विराटच्या एकूण कामगिरीचा विचार केल्यास ६८ सामन्यांमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी तब्बल ४० सामन्यात संघाने विजय मिळविला. तर, १७ सामने भारतीय संघाला गमवावे लागले. उर्वरित ११ सामने अनिर्णित राहिले. त्याच्यात नेतृत्वात भारतीय संघ पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. (Indias Most Successful Captain)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा (mahasports.in)