---Advertisement---

कोहलीसह टीम इंडियाच्या ११ खेळाडूंचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाणार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2019 2:24 PM
---Advertisement---

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना(Day-Night Test) आहे. भारत आणि बांगलादेशचा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. याचमुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली हा दिवस-रात्र कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.

तसेच आज कोहलीसह भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेल्या खेळाडूंचे नाव भारताकडून पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणारे खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.

त्याचबरोबर बांगलादेशच्याही अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेले खेळाडूही बांगलादेशकडून पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणारे खेळाडू ठरले आहेत.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---