मँचेस्टर।आज (27 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विश्वविक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात 37 वी धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 376 व्या सामन्यांमधील 417 वा डाव खेळताना हा टप्पा गाठला.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या नावावर होता.
सचिन आणि लारा या दोघांनीही 453 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटने आज त्यांच्यापेक्षा तब्बल 36 डाव कमी खेळत हा टप्पा पार केला आहे.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा करणारा विराट जगातील एकूण 12 वा क्रिकेटपटू तर भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा केल्या आहेत.
विंडीज विरुद्ध भारत संघातील आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण 26.1 षटकात 3 विकेट्स गमावून 126 धावा केल्या आहेत. भारताचा सलामवीर रोहित शर्मा(18) आज लवकर बाद झाले.
तसेच केएल राहुलने चांगली सुरुवात केली होती पण तोही 48 धावांवर असताना बाद झाला. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विजय शंकरही 14 धावा करुन बाद झाला.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू –
417 डाव – विराट कोहली
453 डाव – सचिन तेंडूलकर / ब्रायन लारा
464 डाव – रिकी पॉटिंग
483 डाव – एबी डिविलियर्स
491 डाव – जॅक कॅलिस
492 डाव – राहुल द्रविड
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
34357 धावा – सचिन तेंडुलकर
24208 धावा – राहुल द्रविड
20000 धावा – विराट कोहली*
18575 धावा – सौरव गांगुली
17253 धावा – विरेंद्र सेहवाग
17083 धावा – एमएस धोनी*
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यानंतर अशी झालीत सेमीफायनलची समीकरणे
–भारताचे माजी प्रशिक्षक म्हणतात, केदार जाधवला या क्रमांकावर खेळवा
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला एमएस धोनीचा तो खास विक्रम मागे टाकण्याची आज सुवर्णसंधी






