अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 15 धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने हा टप्पा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा 58 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पूर्ण केला आहे.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध असा पराक्रम करणारा तो केवळ चौथा भारतीय आणि जगातील 17 वा फलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे.
विराटने आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये 1350 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 488 धावा आणि वनडेमध्ये 1182 धावा केल्या आहेत.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या अॅडलेड कसोटीत भारताने आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर दुसऱ्या सत्रात दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. या डावात भारताकडून मुरली विजय(18) आणि केएल राहुलने(44) चांगल्या सुरुवातीनंतर लगेचच विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे भारताकडून विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
6707 – सचिन तेंडुलकर
3173 – व्हिव्हिएस लक्ष्मण
3071 – राहुल द्रविड
3020* – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम
–होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी
–अॅडलेड कसोटी दरम्यान पृथ्वी शॉने दिली फिटनेस टेस्ट
–यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी