नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेत विराट कोहली ऑस्ट्रलियाच्या नेथन कुल्टर-नाईल या गोलंदाजाकडून ३ वेळा बाद झाला आहे. आणि तेही एकाच प्रकारे बाद झाला आहे. विराटला बाद करणे हे कोणत्याही संघाला महत्वाचे वाटते. त्यामुळेच विराट, नेथन कुल्टर -नाईलचा बनी झालाय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विराटने ५ सामन्यांच्या या मालिकेत १८० धावा केल्या आहेत. यात एक ९२ धावांची खेळीही सामील आहे. ही खेळीही नेथन कुल्टर-नाईलने संपुष्टात आणली होती. तर एका सामन्यात विराट शून्यावर बादही झालाय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये तीन टी २० सामन्यांची मालिका ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. पहिला सामना धोनीच्या घराच्या मैदानावर रांचीमध्ये होणार आहे.
बनी म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या फलंदाजाला एखादा गोलंदाज पुन्हा पुन्हा बाद करतो तेव्हा त्या फलंदाजाला बाद करत असलेल्या गोलंदाजांचा बनी झाला आहे असे म्हटले जाते. क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. रवींद्र जडेजाने मायकल क्लार्कला सलग ५ वेळा बाद केले होते तेव्हा त्याला जडेजाचा बनी म्हणत होते. तसेच दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ग्रामी स्मिथ झहीर खानचा बनी होता. हि त्यातलीच काही उदाहरणे.