रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सोमवारी (दि. 1 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात 18 धावांनी पराभवाचा धक्का दिला. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये विजय मिळवताच बेंगलोर संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले. हा बेंगलोरचा हंगामातील पाचवा विजय होता. या सामन्यानंतर बेंगलोरचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यानंतर लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही भांडण झालं. विराट कोहली आणि गौतम गंभीर यावेळी एकमेकांच्या समोर आले. विजयानंतर बेंगलोर संघाने विजयाचा जल्लोष केला. यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होतोय.
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना बेंगलोरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी यावेळी निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 126 धावा केल्या होत्या. यानंतर लखनऊ संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला असता, त्यांना 19.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 108 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना बेंगलोरने 18 धावांनी खिशात घातला.
Fired up King Kohli is the best version. pic.twitter.com/fI8CmR5Khq
— Johns. (@CricCrazyJohns) May 2, 2023
या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने जल्लोष केला. यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “जर तुम्ही एखाद्याला काही म्हणता, तेव्हा तुम्हालाही ऐकावे लागेल. नाहीतर कुणाला काहीही बोलू नका.” यादरम्यानचा व्हिडिओही आरसीबी संघाने ट्विटरवर शेअर केला आहे.
LSG v RCB, Game Day Dressing Room Reactions
King Kohli reacts to the win, Faf explains the crucial partnership and how Virat’s aggression helps the team, Karn and Hazlewood talk about their performances, before the team sang the victory song. Watch Game Day for more…#PlayBold pic.twitter.com/Jr0kCzYoIa
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 2, 2023
विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेसेजही टाकला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर रोमचा माजी सम्राट मार्कस ऑरेलिस याचा कोट शेअर केला. त्यात लिहिले आहे की, “सर्वकाही जे तुम्ही ऐकता, ते एक मत आहे, तथ्य नाही. सर्वकाही जे आपण पाहतो, तो एक दृष्टिकोन आहे, खरे नाही.”
विजयानंतर विराट म्हणाला की, “आमच्यासाठी हा विजय खूपच महत्त्वाचा होता. खरं तर हे आहे की, लखनऊ संघापेक्षा जास्त पाठिंबा आम्हाला मिळाल्याचे पाहून चांगले वाटले. यावरून समजते की, एक संघ म्हणून आम्हाला किती पसंत केले जाते. तसेच, लोक आम्हाला किती पाठिंबा देतात. हा एक चांगला विजय आहे आणि याचे अनेक कारण आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे हे आहे की, आम्ही या धावांचा बचाव करू शकलो, ही खूप मोठी गोष्ट आहे.”
या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर भांडणासाठी सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावला. विराट आणि गंभीरच्या वर्तनावर आजी-माजी दिग्गजांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (virat kohli big statement after rcb beat lsg see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची शिकार करताच जल्लोष करत होता बिश्नोई, पण अंपायरने मारली चापट? व्हिडिओत लपलंय सत्य
राहुलच्या दुखापतीवर संघ व्यवस्थापन कसा काढणार मार्ग? आरसीबीकडून हरल्यानंतर कृणाल पंड्याने दिली माहिती