सोमवारी (1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत आपला पाचवा विजय नोंदवला. तसेच या सामन्यातनंतर मोठा वादही पाहायला मिळाला. या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने खास ट्विट करत मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले.
चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. विराट कोहली व नवीन उल हक यांच्या दरम्यान सामन्यात वाद झालेला. त्यानंतर सामना संपल्यावर विराट कोहली व लखनऊचा मेंटर गौतम गंभीर यांच्या दरम्यान मोठे वाकयुद्ध रंगले. सामना संपल्यानंतर या सर्व खेळाडूंना आर्थिक दंड ठरवला गेला. त्याचवेळी विराट कोहलीने एक ट्विट करत मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यांचे आभार मानले.
https://twitter.com/imVkohli/status/1653111454357422081?t=wQpCbRGdx8wV18GFqyqDQg&s=19
विराटने लिहिले,
‘आजचा विजय शानदार होता. लखनऊमध्ये जशा प्रकारचा पाठिंबा मिळाला ते पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.’
या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी आरसीबी मैदानात उतरली होती. काहीशा संथ खेळपट्टीवर लखनऊच्या गोलंदाजांनी शानदार मारा केला. फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांनी चांगली सलामी दिल्याने आरसीबीला 126 पर्यंत मजल मारता आली होती. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने पावर प्लेमध्ये लखनऊचे चार फलंदाज बाद केले. त्यानंतर अमित मिश्रा वगळता इतर फलंदाज संघर्ष करू शकले नाहीत. परिणामी लखनऊला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
(Virat Kohli Tweet For Fans After Beating Lucknow Supergiants At Ekana Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: युवा नवीनने घेतला विराटशी पंगा, शाब्दिक चकमकीनंतर झटकला हात
सामना संपल्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये राडा! आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडले दिग्गज






