---Advertisement---

‘तुझ्यासारखे नेतृत्व कोणाचेच नाही’, विराटच्या धोनीला वाढदिवसाच्या ‘कूल’ शुभेच्छा

On: गुरूवार, जुलै 7, 2022 1:39 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जाणारा माजी संघनायक एमएस धोनी (MS Dhoni), आज (७ जुलै) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) याची धोनीविषयी असणारे प्रेम आणि आदर सर्वांनाच माहित आहे. आजच्या दिवशी त्यानेही धोनीला शुभेच्छा दिल्या याचे फार आश्चर्य वाटणार नाही. धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो एक चांगला खेळाडू आणि कर्णधार ठरला आहे.

विराटने धोनीला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने धोनीसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिले, इतरांपेक्षा वेगळे नेतृत्व करणारा. भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी नेहमी मोठ्या भावासारखा आहेस. तुझ्याविषयी प्रेम आणि आदर नेहमी राहणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार.

धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तेव्हा विराटने केलेलं ते भावनिक ट्वीट कोणीही विसरणार नाही. खेळपट्टीवर असताना या दोघांमध्ये नेहमी चांगली भागीदारी पाहायला मिळाली आहे. त्यांचा एकत्र फलंदाजी करताना अतूट विश्वास दिसला आहे. धोनीने विराटला एक उत्तम कर्णधार बनण्यासही मदत करत मैदानावर त्याच्या निर्णयांना पाठींबा दर्शविला आहे.

विराटबरोबरच विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना (Suresh Raina), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), प्रग्यान ओझा, मोहम्मद कैफ आदी यांनीही ट्वीट करत धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/MohammadKaif/status/1544753196781953029?s=20&t=UZaAfyAG5wcVB4xp1A8dRQ

धोनीला पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू शाहनवाज दहानी यानेही ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले, सर्वकालीन एक उत्कृष्ट फिनिशर आणि मनोरंजन करणारा, एक प्रेरणा आणि आदर्श. सर, तुम्ही अजूनही तरूण आहात आणि क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरूस्त आहात, त्यामुळे पुढील काही वर्षे अजून क्रिकेट खेळत राहा.

आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेेंजर्स बेंगलोर यांनीही धोनीला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ENGvsIND: जर्सी बदलली, कर्णधार बदलला, आता इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे नशीब बदलणार?

बर्थ डे बॉय एमएस धोनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल; फोटो व्हायरल

वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---