टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आपल्या शानदार फलंदाजीनं जगभरातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तो जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू पैकी एक आहे. क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत अनेक विक्रम रचले असून आणि अनेक विक्रम मोडले देखील आहेत.
क्रिकेटशिवाय कोहली त्याच्या मैदानाबाहेरील लोकप्रियतेसाठी देखील ओळखला जातो. यावेळी विराटनं सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत मोठी कामगिरी केली आहे. त्यानं देशातील अनेक बड्या स्टार्सना मागे टाकलं आहे. विराट कोहली रणवीर सिंह आणि शाहरुख खान सारख्या बॉलीवूड स्टार्सना मागे टाकून भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे.
या वर्षी कोहलीची ब्रँड मूल्य सुमारे 29 टक्क्यांनी वाढून 1900 कोटी रुपयांपर्यंत (227.9 दशलक्ष डॉलर्स) पोहोचली आहे. सोशल मीडियाची ताकद, ट्रेंडमध्ये राहणं, करिअरमधील यश यावरून सेलिब्रिटीची ब्रँड व्हॅल्यू मोजली जाते.
या यादीत अभिनेता रणवीर सिंह 203.1 दशलक्ष डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर शाहरुख खान 120.7 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर आहे. अक्षय कुमार 111.7 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह चौथ्या स्थानावर आहे. आलिया भट्ट 101.1 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या स्थानावर कायम आहे. याशिवाय या यादीत महेंद्रसिंह धोनी 7व्या, सचिन तेंडुलकर 8व्या, अमिताभ बच्चन 9व्या आणि सलमान खान 10व्या क्रमांकावर आहेत.
विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे. विराट अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. कोहली एका जाहिरातीसाठी 7.5 कोटी ते 10 कोटी रुपये आकारतो. याशिवाय विराट त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 8.9 कोटी रुपये घेतो. या सगळ्यांमुळेच त्यांची ब्रँड व्हॅल्यू इतकी जास्त आहे. विशेष म्हणजे त्यांची ब्रँड व्हॅल्यू सातत्यानं वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तेलंही गेलं आणि तूपही! कर्णधारपदासह पांड्याने उपकर्णधारपदही गमावले, आता फक्त खेळाडू म्हणून…
‘माझ्याकडे दुर्लक्ष झालं.. मन दुखलं.. खोलीत बसून रडलो…’, टीम इंडियात स्थान मिळाल्यावर हर्षित राणा झाला भावूक
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप