Loading...

किंग कोहलीचा पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला जोरदार धक्का

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 91 चेंडूत 8 चौकारांसह 89 धावांची शतकी खेळी केली.

त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाकिस्तानचा दिग्गज माजी फलंदाज इंजमाम उल हकला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

विराटचे आता वनडेमध्ये 245 वनडे सामन्यात 59.85 च्या सरासरीने 11792 धावा झाल्या आहेत. तर इंझमाम उल हकच्या 378 वनडे सामन्यात 11739 धावा आहेत. इंझमाम वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी खेळाडू आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 463 वनडे सामन्यात 18426 धावा केल्या आहेत.

वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

Loading...

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

14234 धावा – कुमार संगकारा (404 सामने)

Loading...

13704 धावा – रिकी पाँटिंग (375 सामने)

13430 धावा – सनथ जयसुर्या (445 सामने)

12650 धावा – माहेला जयवर्धने (448 सामने)

11739 धावा – इंजमाम उल हक (378 सामने)

11703 धावा – विराट कोहली (245 सामने)

 

Loading...

You might also like
Loading...