नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांनी विजय मिळवत मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला २२४ धावांपर्यंत पोहचवले. या खेळीबरोबरच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
या मालिकेत कर्णधार विराट कोहलीने आपल्या बॅटने टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. या मालिकेतील ५ टी २० सामन्यात विराट कोहलीने ३ वेळेस ७० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पाचव्या सामन्यात त्याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळी सोबतच तो कर्णधार म्हणून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. हा विक्रम करताना त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मागे टाकले आहे. केन विलियम्सनने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ११ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे फलंदाज –
१) विराट कोहली : १२ (भारत)
२) केन विलीयमसन : ११ (न्यूझीलंड)
३) ऍरोन फिंच : १० (ऑस्ट्रेलिया)
४) ओएन मॉर्गन : ९ (इंग्लंड)
५) फाफ डू प्लेसीस : ८ (दक्षिण आफ्रिका)
महत्त्वाच्या बातम्या –
मालिका विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरून दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा
विराट जेथे विक्रम तेथे! नाबाद ८० धावांची खेळी करत विराटने केली रोहितच्या या विश्वविक्रमाची बरोबरी
मजबूत जोड! विराट-रोहितची सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी