---Advertisement---

कसोटी निवृत्तीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं, म्हणाला …

---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला. यामुळे कोट्यवधी चाहत्यांच्या भावना ढवळून निघाल्या. यापूर्वी कोहलीने 2024 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी20 फॉरमॅटमधून संन्यास घेतला होता. आता त्याने त्याचा आवडता फॉरमॅट – टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केलं. आता पुढे तो भारतासाठी केवळ वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल.

इंग्लंडमध्ये झालेल्या ‘युवीकॅन’ या युवराज सिंगच्या चॅरिटी कार्यक्रमात विराटने पहिल्यांदा आपल्या टेस्ट संन्यासावर प्रतिक्रिया दिली. होस्ट गौरव कपूरने विराटला रंगात आणत त्याच्याकडून ही प्रतिक्रिया मिळवली. विराट म्हणाला, “मी दोन दिवसांपूर्वीच दाढी रंगवली. हा तो काळ असतो जेव्हा चार दिवसांनी दाढी रंगवावी लागते” यावरून तो आपलं वय आणि जीवनात बदललेल्या प्राथमिकता सूचित करत होता.

या कार्यक्रमात विराट कोहलीने आपल्या माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीबाबत भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर, जर मी त्यांच्या सोबत काम केलं नसतं, तर टेस्ट क्रिकेटमधली माझी यशस्वी वाटचाल अशक्य होती. आमच्यात स्पष्ट संवाद होता, जे खेळाडूच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असतं. त्यांनी मला कधीही अडचणीत एकटं सोडलं नाही. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी माझ्यासाठी समोर उभं राहून प्रश्न झेलले. त्यामुळे माझ्या क्रिकेट प्रवासात त्यांचं मोठं स्थान आहे.”

विराटने भारतीय संघात पदार्पण करताना युवराज सिंग, हरभजन सिंह आणि झहीर खान यांच्यासोबत शेअर केलेल्या आठवणीही सांगितल्या. “मी भारतासाठी खेळायला लागलो तेव्हा युवी पा, भज्जू पा आणि झहीर भाई यांनी मला आपल्या गटात सामावून घेतलं. मला खेळाडू म्हणून विकसित होण्यास मदत केली. ड्रेसिंग रूममध्ये मोकळेपणाने वावरण्याची संधी दिली. मैदानाबाहेर मजा-मस्ती केली आणि मोठं होण्यासाठीची जीवनशैली शिकवली. हे बंधन मी आयुष्यभर जपणार आहे,” असं कोहली भावूक होत म्हणाला.

कोहलीने युवराजच्या कर्करोगावरील संघर्षाबद्दलही आपली भावना व्यक्त केली. “जेव्हा आम्हाला कळलं की त्याला कर्करोग आहे, तो खूप मोठा धक्का होता. आम्ही त्याच्या इतके जवळ असूनही काहीच अंदाज नव्हता. पण त्याने ज्याप्रकारे त्या आजाराला हरवून पुन्हा टीममध्ये पुनरागमन केलं, तो खरोखर एक चॅम्पियन आहे. आणि मी त्या वेळेस कर्णधार होतो,” असं तो म्हणाला.

कोहलीने 2017 मध्ये कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याची आठवणही शेअर केली. “त्यावेळी आमचं टॉप ऑर्डर लवकर आऊट झालं होतं. युवराजने 150 च्या आसपास आणि धोनीने 110 रन्स केले होते. मी तेव्हाही म्हणालो होतो की हे अगदी बालपणीसारखं वाटतंय, जेव्हा मोठ्या टीव्हीवर त्यांचं खेळणं बघायचो. त्या दोघांविषयी माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. मी हे कोणासाठीही नाही, त्यांच्या साठीच करतो,” असं कोहली म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---