भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम वनडे सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) पार पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला ३-० ने मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केल्याचे पाहायला मिळू शकतात. दरम्यान मालिकेतील अंतिम वनडे सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक मोठा विक्रम तोडण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
विराट कोहलीने या मालकेतील अंतिम वनडे सामन्यात १५ धावा करताच, तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ॲलेन बॉर्डरला मागे सोडणार आहे. विराट कोहलीकडे तीनही स्वरूपात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याची सुवर्णसंधी आहे. विराट कोहलीने आतापर्यंत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ७६ सामन्यात ५९.७३ च्या सरासरीने ३५८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ शतक आणि २१ अर्धशतक झळकावले आहेत.
वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तीनही स्वरूपात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिसच्या नावावर आहे. जॅक कॅलिसने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या ६६ सामन्यात ४१२० धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ॲलेन बॉर्डरने ९२ सामन्यात ३५९८ धावा केल्या आहेत. विराट कोहली त्यांची बरोबरी करण्यापासून केवळ १४ धावा दूर आहे.
तीनही स्वरूपात वेस्ट इंडीज संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१) ४१२० धावा – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
२) ३५९८ धावा – ॲलेन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
३) ३५८४ धावा – विराट कोहली (भारत )
भारतीय संघाने या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली आहे. तसेच मालिकेतील अंतिम सामना जिंकून भारतीय संघाला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत वेस्ट इंडीज संघाला एकही वेळेस क्लीन स्वीप केले नाहीये. हा सामना जिंकून भारतीय संघ ३९ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश? जाणून घ्या सविस्तर
तिसरा वनडे सामना ३-० ने जिंकून रोहित अँड कंपनी तोडणार ‘हा’ ३९ वर्षांपासून न तुटलेला रेकॉर्ड
मेगा लिलाव: राजस्थान रॉयल्सची तयारी पूर्ण, कर्णधार संजू सॅमसनने संघाच्या रणनितीचा केला उलगडा