---Advertisement---

विराट कोहलीकडून ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या या सर्वात मोठ्या विक्रमाला धोका…

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2019 5:14 PM
---Advertisement---

आजपासून (30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला माजी कर्णधार एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

जर या सामन्यात भारताने विजय मिळवला तर विराटचा कसोटी कर्णधार म्हणून हा 28 वा विजय ठरेल. त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार ठरेल. सध्या सर्वाधिक कसोटी विजय मिळणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट आणि धोनी संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.

धोनीने कसोटीमध्ये भारताचे 60 सामन्यात नेतृत्व करताना 27 विजय मिळवले आहेत. तर विराटनेही आत्तापर्यंत 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद सांभाळताना 27 विजय मिळवले आहेत.

कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट आणि धोनी पाठोपाठ 21 विजयांसह सौरव गांगुली आहे.

#कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार-

27 – एमएस धोनी (60 सामने)

27 – विराट कोहली (47 सामने)

21 – सौरव गांगुली (49 सामने)

14 – मोहम्मद अझरुद्दीन (47 सामने)

9 – सुनील गावस्कर (47 सामने)

9 – मन्सूर अली पतौडी (40 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हा मोठा पराक्रम करण्यापासून इशांत शर्मा केवळ एक विकेट दूर

डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने शब्द पाळला, विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट

अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने दिली ही प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment