बुधवारपासून (१९ जानेवारी ) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) प्रमुख फलंदाजाची भूमिका पार पाडणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान विराट कोहलीला एक मोठा विक्रम मोडण्याची देखील संधी असणार आहे
विराट कोहली तोडू शकतो मोठा विक्रम
विराट कोहली ज्यावेळी मैदानात पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार, त्यावेळी त्याची लक्ष सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर असू शकते. सचिन तेंडुलकरच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये परदेशात जाऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. सचिन तेंडुलकरने परदेशात आतापर्यंत एकूण ५०६५ वनडे धावा केल्या आहेत, तर विराट कोहली ५०५७ वनडे धावा करत दुसऱ्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात ९ धावा करताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत, परदेशात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरू शकतो.
अधिक वाचा – दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये विराटने पाडलाय धावांचा पाऊस! ‘अशी’ राहिलीय ‘रनमशीन’ची कामगिरी
परदेशात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एमएस धोनी तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ४५२० धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या स्थानी राहुल द्रविड आहे, ज्याने ३९९८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या मैदानावर ३४६८ धावा केल्या आहेत.
व्हिडिओ पाहा – क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
परदेशात वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज
५०६५ धावा – सचिन तेंडुलकर
५०५७ धावा – विराट कोहली
४५२० धावा – एमएस धोनी
३९९८ धावा – राहुल द्रविड
३४६८ धावा – सौरव गांगुली
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१(केपटाऊन)
महत्वाच्या बातम्या
पुणे-लोणावळा लोकलचे धक्के खाणारा विकी ओस्तवाल गाजवतोय विश्वचषक; वाचा त्याची प्रेरक कहाणी
आयपीएल संघांची उडाली झोप; ‘हे’ प्रमुख इंग्लिश खेळाडू नसणार मेगा लिलावाचा भाग
हे नक्की पाहा: