आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना शुक्रवार रोजी (२४ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात शारजाह येथे खेळला जाणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीचा आरसीबी संघ कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला होता. आरसीबी सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजासोबत गोलंदाजांनीही अत्यंत खराब कामगिरी केली होती. अशा स्थितीत विराट सीएसकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. युएईच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना खूप मदत होत असते. त्यामुळे विराट आयपीएलमधील वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला संधी देऊ शकतो.
२८ वर्षीय सैनी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल २०१९ आणि २०२० मध्ये सैनी हा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला होता. त्याने आयपीएल २०१९ मध्ये १५२.८५ किमी/ताशीच्या वेगाने चेंडू टाकला होता.
आयपीएलमध्ये सैनीची कामगिरी फारशी चांगली नसली तरीही या गोलंदाजाने २७ आयपीएल सामन्यांमध्ये फक्त १७ विकेट्स घेतल्या आहेत. अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर सैनीला एक वनडे आणि एक टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली पण तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. असे असूनही, सैनी फलंदाजांना त्याच्या वेगाने आणि यूएईच्या खेळपट्ट्यांवर बाऊन्सर टाकून अडचणीत आणू शकतो. तसे, टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये सैनीचा विक्रम उत्कृष्ट आहे, जिथे त्याने १० सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पूर्वी, रॉयल चँलेजर्स बंगळुरुला कोलकाता नाईट रायडर्सने धोबीपछाड मारत आसमान दाखवले होते. कोलकताच्या संघाने ९ विकेट्सने दमदार विजय मिळवला. अबूधाबीच्या शेख जायेद मैदानात सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत केकेआरने आरसीबीला ९२ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि वेकंटेश अय्यर यांनी आक्रमक खेळी करत ९ गडी राखून आरसीबीवर दमदार विजय मिळवला. यासोबतच केकेआरने आयपीएलच्या आपल्या इतिहासात सर्वात जास्त चेंडू राखून विजय मिळवला आहे. केकेआरने ६० चेंडू राखून आरसीबीवर विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम
जगात भारी बापलेकाची जोडी! सचिनने मुलासोबतचा समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो केला शेअर
श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला अन् इतिहास घडला, वाचा भारताच्या पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकाची कहाणी