fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….

The Story of 2007 T20I World Cup

September 24, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ BCCI

Photo Courtesy: Twitter/ BCCI


२४ सप्टेंबर २००७.. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णदिवसांपैकी एक दिवस..१९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने जेव्हा विश्वविजेता झाला तो दिवस.. २००३ विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव झाल्याने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले होते. मात्र, २००७ मध्ये भारत विश्वविजेता ठरलाच.. पण, भारताने यावेळी एकदिवसीय विश्वचषक नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्याने सुरू झालेल्या टी२० या प्रकारात विश्वविजेतेपद पटकावले होते.

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. वेस्ट इंडिजमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातून नामुष्कीरित्या बाहेर पडल्यानंतर, क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारातील विश्वचषकासाठी भारताने आपला युवा संघ पाठवला. सचिन, द्रविड, गांगुली, जहीर अशी वरिष्ठ मंडळी या स्पर्धेत सहभागी होणार नव्हती. अनुभवी खेळाडू म्हणून फक्त वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग संघात होते. कर्णधारपद सुद्धा उण्यापुऱ्या तीन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झालेल्या एमएस धोनीच्या हाती सोपवले होते.

भारताचा सलामीचा सामना स्कॉटलंडविरुद्ध पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द केला गेला. भारताचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. एकदिवसीय विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध कायम विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने, क्रिकेटच्या या छोट्या प्रकारातील विश्वचषकात देखील पाकिस्तानवर विजय मिळविला. फलंदाजीत रॉबीन उथाप्पाने झळकावलेल्या अर्धशतकानंतर, श्रीसंतच्या अचूक गोलंदाजी व युवराज सिंहच्या चपळ क्षेत्ररक्षणाने पाकिस्तान १४२ धावांची लक्ष पूर्ण करू शकला नाही व २० षटकांअंती सामना बरोबरीत सुटला. बॉल-आऊट पद्धतीने निकाल लावल्यानंतर भारत विजेता ठरला.

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारताने सुपर-एट फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या गटात भारताचा समावेश करण्यात आला. पहिल्या सुपर-एट सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध १९० धावांचा पाठलाग भारत करू शकला नाही आणि भारताला अवघ्या १० धावांनी पराभव पत्करावा लागला.

भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध होता. या सामन्यात भारतासाठी “करा किंवा मरा” अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण, भारत हा सामना हरला तर स्पर्धेतून बाहेर पडू शकत होता. भारताचे अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनी शतकी भागीदारी करत अफलातून सुरुवात केली. सलामीवीरांच्या कामगिरीवर, युवराज सिंहने कळत चढविला. अवघ्या १२ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. याच खेळीदरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला त्याने सलग सहा षटकार खेचले. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावत भारताला १८ धावांनी विजय मिळवून दिला.

सुपर-एटमधील अखेरच्या सामन्यात भारतासमोर यजमान दक्षिण आफ्रिकेचे आव्हान होते. भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना १५३ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. या सामन्यात भारतासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आरपी सिंग नायक ठरला. त्याने ग्रॅमी स्मिथ, हर्षल गिब्ज, शॉन पोलॉक व अॅल्बी मॉर्केल हे प्रमुख खेळाडू बाद करत द. आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर संपविला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली.

उपांत्य फेरीत भारतासमोर तगड्या व ज्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते अशा ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूंशी भिडण्याची जबाबदारी भारताच्या अनुभवी खेळाडूंनी म्हणजे एमएस धोनी व युवराज सिंहने घेतली. अवघ्या ३० चेंडूत ७० धावा ठोकताना युवराजने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. युवराजचे दमदार अर्धशतक व धोनीच्या १८ चेंडूतील तुफानी ३६ धावांच्या जोरावर भारताने १८८ अशी मजबूत धावसंख्या फलकावर लावली. प्रत्युत्तरात, मॅथ्यू हेडन व अॅण्ड्रू सायमंड्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करत, भारतावर दडपण आणले. मात्र श्रीसंतने हेडनच्या यष्ट्या उध्वस्त करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर, सर्वच गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला वरचढ होऊ दिले नाही व १५ धावांनी सामना जिंकत अंतिम फेरीत धडक दिली.

अंतिम सामना खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट ठरणार होता. कारण, पुन्हा एकदा भारतासमोर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान ठाकला होता. सामन्यापूर्वीच, भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू व सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जायबंदी झाला. त्याच्या जागी, अष्टपैलू इरफान पठाणचा मोठा भाऊ युसुफ पठाण याला संधी देण्यात आली. जोहान्सबर्गचे वॉडरर्स मैदान एका ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार ठरणार होते.

भारतीय कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. गंभीर व पहिला सामना खेळत असलेल्या युसुफ पठाणने डावाची सुरुवात केली. पठाणने पहिल्याच षटकात षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले. मात्र, तो फार काळ टिकला नाही. उथाप्पा, युवराज व धोनी अंतिम सामन्यात तितकेसे योगदान देऊ शकले. एका बाजूने गंभीर किल्ला लढवत राहिला. १८ व्या षटकात बाद होण्यापूर्वी, गंभीरने ५४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ७४ धावांची अविस्मरणीय खेळी केली. अखेर, युवा रोहित शर्माने ३० धावांवर नाबाद राहत भारताची धावसंख्या १५७ पर्यंत पोहोचवली.

पाकिस्तानला पहिल्या टी२० विश्वचषकाची विजेतेपद पटकविण्यासाठी १५८ धावांची गरज होती. आरपी सिंहने पहिल्याच षटकात मोहम्मद हफीजला बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. पुढच्या षटकात कामरान अकमलला शून्यावर त्रिफळाचीत करत त्याने भारताला उत्तम सुरुवात दिली. इमरान नजीर व अनुभवी युनूस खान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. आक्रमक होत असलेल्या नजीरला उथाप्पाने थेट फेकीवर धावबाद केले. युनुस खान व कर्णधार शोएब मलिक हेदेखील जास्त काळ तग धरू शकले नाहीत. पाकिस्तानला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या, शाहिद आफ्रिदीला इरफान पठाणने पहिल्या चेंडूवर बाद करत, सामना भारताच्या बाजूने झुकवला. या सर्व घटनाक्रमा दरम्यान मिसबाह उल-हक खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. भारताच्या गोलंदाजांचा सामना करताना त्याला कसलीच अडचण येत नव्हती. भारताचा सर्वात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह याला, सलग षटकार ठोकत त्याने सामन्यात प्राण ओतला. यासिर अराफत व सोहेल तन्वीर यांनीदेखील फलंदाजीत आपले योगदान दिले.

अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी, तेरा धावांची आवश्यकता होती व त्यांचा एकच गडी बाद होणे शिल्लक होते. भारतीय कर्णधार एमएस धोनीसमोर अखेरचे षटक टाकण्यासाठी अनुभवी हरभजन सिंह व युवा जोगिंदर शर्मा असे दोन पर्याय होते. या स्पर्धेपूर्वी, कप्तानीचा कसलाही अनुभव नसलेल्या धोनीने अखेरच्या षटकासाठी चेंडू जोगिंदर शर्माच्या हाती सोपविला. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती.

जोगिंदर शर्माने चेंडू टाकला आणि तो वाईड गेला. पाकिस्तानला एक अतिरिक्त धाव मिळाली. त्यानंतर जोगिंदर शर्माने निर्धाव चेंडू टाकला. पुढचा चेंडू यॉर्कर टाकायचं नादात फुलटॉस पडला व मिसबाहने कोणतीही चूक न करता तो प्रेक्षकांत भिरकावला. या षटकारामुळे पाकिस्तानला विजयासाठी ४ चेंडूत ६ धावा असे समीकरण आले. कर्णधार धोनी धावत जोगिंदर शर्मापाशी गेला आणि त्याला काहीतरी समजावू लागला. शर्मा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. शर्माने धावत येऊन चेंडू फेकला व मिसबाहने विचित्र पद्धतीने स्कूपशॉट खेळला. चेंडू हवेत उडाला आणि…

टीव्हीवर सामना पाहणाऱ्या सर्व भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या काळजात धस्स झाले. सर्वांना वाटले हवेत उडालेला चेंडू षटकार जाणार, मात्र जोगिंदर शर्माच्या त्या चेंडूला वेग नसल्याने तो उंच उडाला व फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रीसंतच्या हाती विसावला. समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री यांनी आवेशपूर्ण आवाजात भारत विश्वविजेता झाल्याची पुष्टी केली.. सर्व मैदानात भारतीय खेळाडू आनंद व्यक्त करू लागले.. इकडे भारतात तर दिवाळी, दसरा, ईद सर्व काही साजरे झाले.. भारत तब्बल २४ वर्षानंतर विश्वचषक उंचावत होता.. टी२० चा असला तरी तो विश्र्वचषकच होता..

एमएस धोनीचे कल्पक नेतृत्व, अनुभवी खेळाडूंनी स्वीकारलेली जबाबदारी व युवा खेळाडूंच्या सोबतीच्या जोरावर भारत पहिला टी२० विश्वविजेता झाला होता.

वाचा-

-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू

-आणि शाहरुखने पुन्हा वानखेडेवर नाही ठेवले पाऊल

-आयर्लंड-इंग्लंड-आयर्लंड असा प्रवास करणारा एड जॉयस


Previous Post

‘या’ खेळाडूला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती, सीएसकेच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया

Next Post

आज रंगणार बेंगलोर विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या ‘या’ सामन्याबद्दल सर्वकाही

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
क्रिकेट

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/RCBTweets

आज रंगणार बेंगलोर विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या 'या' सामन्याबद्दल सर्वकाही

Photo Courtesy: Facebook/IPL

दहा कोटींना खरेदी केलेला आरसीबीचा 'हा' शिलेदार दुसऱ्या सामन्याला देखील मुकणार?

Photo Courtesy: www.iplt20.com

रोहित शर्माने तोडला धोनीचा 'हा' विक्रम, आता गेल, डिविलियर्सच्या विक्रमावर आहे नजर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.