भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका (3 Matches of ODI Series) सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता या मालिकेतील तिसरा सामना कटक येथे रविवारी पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे.
विराटला वनडेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसला (Jacques Kallis) मागे टाकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे.
सध्या विराट या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्याने 241 सामन्यात 59.70 च्या सरासरीने 11,524 धावा केल्या आहेत. दुसरीकडे या यादीत सातव्या क्रमांकावर असणाऱ्या कॅलिसने 328 सामन्यांमध्ये 44.36 च्या सरासरीने 11579 धावा केल्या आहेत.
या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) प्रथम क्रमांकावर आहे. तर, श्रीलंकेचा कुमार संगकारा (Kumar Sangakara) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) हे खेळाडू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
तसेच कर्णधार म्हणून विराटला 11000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा सहावा खेळाडू होण्यासाठी आणखी 116 धावांची आवश्यकता आहे. सध्या विराटने कर्णधार म्हणून 10884 धावा केल्या आहेत. त्यामुळे जर त्याने 11000 धावांचा टप्पा पार केला तर तो हा टप्पा पार करणारा जगातील सहावा तर भारताचा एमएस धोनीनंतरचा दुसरा कर्णधार ठरेल.
वनडेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
18426 – सचिन तेंडूलकर
14234 – कुमार संगकारा
13704 – रिकी पॉटिंग
13430 – सनथ जयसुर्या
12650 – माहेला जयवर्धने
11739 – इंजमाम उल-हक
11579 – जॅक कॅलिस
11524 – विराट कोहली
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –
15440 – रिकी पॉटिंग
14878 – ग्रॅमी स्मिथ
11561 – स्टिफन फ्लेमिंग
11207 – एमएस धोनी
11062 – ऍलेन बॉर्डर
10884 – विराट कोहली
शिवम दुबे आणि जेसन होल्डरचा हा खास व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहे व्हायरल
वाचा- 👉 https://t.co/oqamvSxXUE👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #shivamdube
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
चेन्नई सुपर किंग्स संघात सामील झाल्याबद्दल सॅम करन म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/Dpv9okpIqv👈#म #मराठी #IPL2020Auction #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019