---Advertisement---

३ वेळा हुलकावणी दिलेला विक्रम करण्याची आज कोहलीला ‘विराट’ संधी

On: मंगळवार, जुलै 3, 2018 7:34 PM
---Advertisement---

मँचेस्टर। भारतीय संघ आज 3 जुलैला इंग्लंड विरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

विराटने या सामन्यात जर 8 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार करेल. त्याने हा टप्पा आज पार केला तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरेल.

सध्या हा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमच्या नावावर आहे. त्याने 67 सामन्यात 66 डाव खेळताना हा विक्रम केला होता. तसेच त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचाच मार्टिन गप्टील आहे. त्याने 68 डावात 2000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा गाठला होता.

विराटने आत्तापर्यंत 59 टी20 सामने खेळताना 55 डावात 48.58 च्या सरासरीने 1992 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला 56 व्या डावातच 2000 धावा करण्याची संधी आहे.

भारताकडून टी20 मध्ये 2000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनण्याची संधी

भारताकडून महिला कर्णधार मिताली राज ही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा करणारी एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यामुळे विराटला भारताकडून टी20 मध्ये 2000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनण्याची संधी आहे.

त्याचबरोबर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये आत्तापर्यंत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि पाकिस्तानच्या शोएब मलिकने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे विराटला आज पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 2000 धावा पूर्ण करणारा चौथा क्रिकेटपटू बनण्याची संधी आहे.

विराटचा आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम

आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. त्याने 27 टी20 सामन्यात 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आॅस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच आहे. त्याने 28 डावात हा टप्पा पार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या कर्णधार-उपकर्णधारांमध्ये आज या विक्रमासाठी टशन

विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने आज करुन दाखवलं

त्याची विराटसोबत खेळण्याची हुकलेली संधी आता पुर्ण होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment