---Advertisement---

जेव्हा किंग कोहली साजरा करतो त्याच्या बाॅडीगार्डचा वाढदिवस, पहा व्हीडिओ

---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत असतो. पण यावेळी त्याने त्याचा अंगरक्षक फेझल खानचा वाढदिवस साजरा केल्याने चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत दिसते की विराट फेझलचा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच फेझलने भरवलेला केकही विराटने आवडीने खाल्ला. यावेळी विराटने फेझलला काही भेटवस्तूही दिली आहे. असा वाढदिवस साजरा होताना फेझलच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्ट दिसून येत होता. विराटच्या या कृतीमुळे त्याचे कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/p/BuJ9JAZjBKo/?utm_source=ig_embed

विराट सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ 3 विकेट्स पराभूत झाला आहे. तर दुसरा सामना उद्या(27 फेब्रुवारी) बंगळूरु येथे होणार आहे.

विराटने पहिल्या सामन्यात 24 धावा केल्या होत्या. याबरोबरच त्याने ऑस्ट्रेलिया विरुदध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 500 धावा पूर्ण करण्याचा पराक्रमही केला होता. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कोणत्याही प्रतिस्पर्धी विरुद्ध 500 धावांचा टप्पा पार करणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुधर जाओ! विरेंद्र सेहवागच्या पाकिस्तानवरील त्या ट्वीटला ४ तासांत १८ हजार रिट्वीट

-पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना विराटने चाहत्यांना दिला शांत रहाण्याचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment