---Advertisement---

टी20 विश्वचषकाचा बादशाह बनण्याची विराटकडे सुवर्णसंधी! केवळ इतक्या धावा करतात घडणार भीमपराक्रम

On: गुरूवार, ऑक्टोबर 27, 2022 10:10 AM
Virat kohli v pak
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असणार आहे. नेदरलँड्सविरूद्ध त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवल्यास तो टी20 विश्वचषक इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बनू शकतो.

टी20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात केली. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताच्या विजयाचा नायक विराट कोहली ठरला. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. भारतीय संघाला पुन्हा एकदा त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

नेदरलँड्सविरूद्ध मैदानात उतरताना विराटसमोर टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज बनण्याचे लक्ष असेल. विराट सध्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपला पाचवा टी20 विश्वचषक खेळत असलेल्या विराटने आत्तापर्यंत 927 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानी श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने आहे. त्याने 2007 ते 2014 या कालावधीत सहा विश्वचषक स्पर्धा खेळताना 1016 धावा केलेल्या. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 2007 ते 2021 या कालावधीत टी20 विश्वचषकात सहभाग नोंदवत 965 धावा केलेल्या. विराटला या यादीत प्रथम क्रमांकावर जाण्यासाठी 73 तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी 39 धावांची गरज आहे. विराट या सामन्यात अपयशी ठरला तरी पुढे विश्वचषकात त्याला हा विक्रम मोडण्याची अधिक संधी मिळेल.

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज

माहेला जयवर्धने- 1016

ख्रिस गेल- 965

विराट कोहली- 927

तिलकरत्ने दिलशान- 897

रोहित शर्मा- 851

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा

भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---