भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली याची फॅन फॉलोईंग जगभरात आहे. सध्या तो जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला असे असताना सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणारे करोडो लोक आहेत. आता यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक नवा पराक्रम करत, इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयांत आपले अव्वलस्थान अबाधित राखले आहे.
इंस्टाग्राम हे सध्या सर्वात प्रभावी सोशल मीडिया माध्यम असल्याचे बोलले जाते. जगभरात या माध्यमाचे अब्जावधी खातेधारक आहेत. अनेक जण या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करत पैसे देखील कमावतात. इंस्टाग्राम काही सेलिब्रिटींना पोस्ट करण्याचे पैसे देखील देते. याच बाबत अमेरिकेतील एका कंपनीने नुकताच अहवाल सादर केला. यामध्ये एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली.
या यादीनुसार पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा जगात इंस्टाग्रामवरून सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. तो एका पोस्टचे तब्बल 26.7 कोटी इतके पैसे घेतो. त्या पाठोपाठ अर्जंटीनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 21.05 कोटी भारतीय रुपये एका पोस्टसाठी मानधन घेताना दिसतो. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून विराट एका पोस्टसाठी भारतीय रुपया तब्बल 11.45 कोटी रुपये आकारतो. हा आकडा इतर कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींपेक्षा खूप अधिक आहे.
विराट कोहली याचे इंस्टाग्रामवर तब्बल 256 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. विराट सातत्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट करत असतो. याव्यतिरिक्त विराट विविध ब्रँड व कंपन्यांचे प्रमोशन करत असल्याने, त्यातून देखील आर्थिक नफा मिळवताना दिसतो.
(Virat Kohli Charge 11.45 Crores From Instagram For One Post)
महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते






