---Advertisement---

“एक गोष्ट खात्रीशीर सांगू शकतो की…”, विराटच्या निर्णयावर बालपणीच्या प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रीया

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 11:14 AM
Virat-Kohli-Childhood-Coach
---Advertisement---

विराट कोहलीने (Virat Kohli) ७ वर्ष भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पडली. अखेर शनिवारी (१५ जानेवारी) त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून खेळलेल्या ६८ कसोटी सामन्यांपैकी ४० कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. पुढील कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. परंतु हा कसोटी सामना खेळण्यापूर्वीच त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांना (Virat Kohli childhood coach) देखील आश्चर्य झाले आहे.

विराट कोहलीने अचानक केलेल्या घोषणेनंतर त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांना आश्चर्य झाले आहे. त्यांनी म्हटले की, “हा एक आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे. कारण हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मला खरे चित्र कळेपर्यंत, त्याने कर्णधारपद का सोडले आहे हे मी सांगू शकणार नाही. पण मी इतकं खात्रीशीर सांगू शकतो की, त्याने हा निर्णय घाईत घेतला नसेल.”

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

तसेच ते पुढे म्हणाले की, “माझे असे म्हणणे आहे की, कर्णधार म्हणून त्याने भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान दिले आहे. तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. जेव्हा त्याला कर्णधारपद मिळाले त्यावेळी भारतीय कसोटी संघ ७ व्या क्रमांकावर होता. आता हा संघ पहिल्या स्थानी आहे.”

आयसीसी टी२० विश्वचषक ही स्पर्धा टी२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा ठरली होती. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने कर्णधार पदावरून माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. आता तो पुन्हा एकदा एक फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी खेळताना दिसून येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी

विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला

हे नक्की पाहा :

विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव। Kohli thanks Dhoni-Shastri

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---