बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करताना मोठा विक्रम केला आहे.
त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असे करणारा तो भारताचा 13 वा खेळाडू ठरला आहे. त्याचा हा 15 वा सामना असून त्याने हा टप्पा 26 व्या डावात पूर्ण केला आहे. यात त्याच्या 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर 2535 धावांसह अव्वल स्थानी आहे.
तसेच विराटने इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये 9 सामने खेळले असून 70.25 च्या सरासरीने 843 धावा केल्या आहेत. तसेच विराटचा हा इंग्लंडमधील 6 वा सामना असून त्याला यात शतक किंवा अर्धशतक करता आलेले नव्हते, पण या सामन्यात त्याने इंग्लंडमध्ये कसोटीतील पहिले अर्धशतक केले आहे.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 287 धावा केल्या आहेत. भारताकडून आर आश्विनने 62 चेंडूत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
तसेच भारताने पहिल्या डावात 47 षटकात 6 बाद 153 धावा केल्या आहेत. विराट कोहली 52 धावांवर आणि आर आश्विन 0 धावांवर नाबाद खेळत आहेत.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1000 धावा करणारे अन्य भारतीय फलंदाज-
सचिन तेंडूलकर – 2535 धावा
सुनील गावस्कर – 2483 धावा
राहुल द्रविड – 1950 धावा
गुंडप्पा विश्वनाथ -1880 धावा
दिलीप वेंगसरकर -1598 धावा
कपिल देव – 1355 धावा
मोहम्मद अझरुद्दीन -1278 धावा
विजय मांजरेकर -1181 धावा
एमएस धोनी – 1157 धावा
फरोख इंजिनियर -1113 धावा
चेतेश्वर पुजारा -1061 धावा
रवी शास्त्री – 1026 धावा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज
–‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी
–कसोटी क्रिकेटमध्ये कबूतराने मिळवली पहिली विकेट