भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात ३ सामन्यांची कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली कसून सरावालाही लागला आहे. मात्र ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच द्रविड यांच्यावर मोठी प्रतिक्रिया पुढे आली आहे.
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी द्रविडच्या काळातील संघाट्या मनासिकता आणि विचारशैलीवरच प्रश्न उपस्थित केले आहे.
राहुल द्रविडचा संघ होता रक्षात्मक
यूट्यूब चॅनल खेलनितीशी बोलताना राजकुमार म्हणाले की, “जेव्हा राहुल द्रविड खेळत होते, तेव्हा त्यांच्या संघाची विटारशैली रक्षात्मक होती. त्यांचा संघ कशाही प्रकारे पराभूत होऊ इच्छित नसायचा. परंतु आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघ कोणत्याही परिस्थितीत विजयासाठीच खेळत असतो. कसोटी सामन्यांमध्ये ५ गोलंदाजांसह उतरणे, हे याचे उत्तम उदाहरण आहे.”
संघाचे नेतृत्त्व कर्णधार करतो, प्रशिक्षक नाही
राजकुमार पुढे बोलताना म्हणाले की, मुख्य प्रशिक्षकाचे काम हे फक्त रणनिती बनवणे आणि युवा खेळाडूंमध्ये सुधारणा घडवून आणणे हे असते. त्यांनी कितीही काही केले तरीही शेवटी संघाचे नेतृत्त्व एक कर्णधारच करत असतो. याविषयी बोलताना त्यांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचे उदाहरण वापरले आहे.
राजकुमार म्हणाले की, “राहुल द्रविडने ग्रेग चॅपलचे पूर्ण प्रकरण पाहिले आहे. त्याला माहिती आहे की, प्रशिक्षक काय काम करतो. त्याचे काम रणनिती बनवणे हे असते. तसेच युवा खेळाडूंना तयार करण्यातही त्याची भूमिका असते. पण शेवटी कर्णधारच संघाचे नेतृत्त्व करत असतो. ”
बीसीसीआयवरही साधला होता निशाणा
यापूर्वी विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतरही त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार यांनी प्रतिक्रिया दिली होती.
राजकुमार यांनी म्हटले की, “मी अजून तरी या प्रकरणी विराटशी बोललेलो नाही. त्याचा फोन स्विच ऑफ दाखवत आहे. त्याने आपला फोन स्विच ऑफ करण्यामागचे कारण मला माहित नाही. पण मला वाटते की, विराटने स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. त्यामुळे संघ निवडकर्त्यांनी त्यावेळी त्याला सांगायला हवे होते की, तू पूर्ण मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा दे. किंवा कोणत्याही स्वरुपातील कर्णधारपदावरुन त्याला काढायला नव्हते पाहिजे होते.”
“विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन का हटवण्यात आले, यामागचे कोणतेही कारण निवड समितीने सांगितलेले नाही. मला माहिती नाही की, बीसीसीआय आणि निवडकर्ते काय करू इच्छित आहेत. बीसीसीआयमध्ये अजिबात कसलीही पारदर्शकता नाही. हा सर्व प्रकार कशामुळे घडला हे मला अजूनही समजत नाहीये,” अशा शब्दांमध्ये त्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवींच्या खराब फॉर्मवर ‘या’ ५ खेळाडूंची लय टाकणार पडदा! दक्षिण आफ्रिकेत घालणार धुमाकूळ
द. आफ्रिकेच्या ताफ्यात पसरलीय ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, कर्णधारालाही आठवण आहे ३ वर्षांपूर्वीची जखम!
भारतीय क्रिकेटमध्ये फुटले वादांचे पेव: आता अश्विन-शास्त्री आमने-सामने; वाचा पूर्ण प्रकरण