विश्वचषक 2023 स्पर्धेतील 37 व्या सामन्याचे आयोजन ईडन गार्डन्स येथे होत आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या 35 व्या वाढदिवस त्याने या सामन्यात आपले 49 वे वनडे शतक पूर्ण केले. यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली.
या विश्वचषकापूर्वी विराटच्या नावे 47 वनडे शतके जमा होती. या सामन्याआधी त्याने या विश्वचषकात चार अर्धशतके व एक शतक ठोकले होते. या तीनही अर्धशतकात तो 80 पेक्षा जास्त धावा करून बाद झालेला. या सामन्यात रोहित शर्मा आक्रमक 40 धावा करून बाद झाल्यानंतर तो मैदानात उतरला.
त्याने चौथ्या चेंडूवर शानदार चौकार वसूल करत सुरुवात केली. फिरकी गोलंदाजांना योग्य सन्मान देत त्याने आपले स्पर्धेतील पाचवे शतक पूर्ण केले. इतर फलंदाज आक्रमकपणे खेळत असताना त्याने संघाचा डाव सावरला. भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 121 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी केली. त्यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता.
हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 49 वे शतक ठरले. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वनडे शतकांची बरोबरी केली. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे 79 वे शतक ठरले. याच विश्वचषक त्याच्याकडे 50 वनडे शतकांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असेल.
(Virat Kohli Complete His 49 ODI Century Equal Sachin Tendulkar)
हेही वाचा-
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI