बलाढ्य भारतीय संघ रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सुरुवात केली. मात्र, सहाव्या षटकातच भारताला धक्का बसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा कमी चेंडूत जास्त धावा करून बाद झाला.
रोहितची विकेट
झाले असे की, भारताकडून डावाची सुरुवात करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. तो वेगाने धावा करत होता. मात्र, त्याला फार काळ मैदानावर टिकता आले नाही. त्याला सहावे षटक टाकत असलेल्या कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने पाचव्या चेंडूवर कर्णधार टेम्बा बावुमा याच्या हातून झेलबाद केले.
रोहितने यावेळी फक्त 24 चेंडूंचा सामना करताना 40 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहित बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 1 बाद 62 इतकी होती. यावरून समजते की, रोहितने संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. (Kagiso Rabada takes Rohit Sharma wicket in ind vs sa match cwc 2023)
Well played, Rohit Sharma.
40 runs from just 24 balls – given a great start for India, Captain is leading the team by example. pic.twitter.com/X5ob95HvYR
— Johns. (@CricCrazyJohns) November 5, 2023
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 37व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
हेही वाचा-
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI
इंग्लंडच्या पराभवानंतर जोस बटलरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एक कर्णधार म्हणून मी… ‘