आयपीएल २०२० चा हंगाम संपला की भारतीय संघ लगचेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात ३ टी२०, ३ वनडे आणि ४ कसोटी सामने होणार आहेत. मात्र आता या दौऱ्यातील ३ कसोटी सामन्यांना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता आहे. याबद्दल त्याने बीसीसीआयला कळवले आहे.
जानेवारीमध्ये विराट बनणार ‘बाबा’
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबर ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहे. याचदरम्यान विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पहिल्यांदाच पालक बनणार आहेत. त्या दोघांनी सप्टेंबरमध्येच ते जानेवारीमध्ये पालक बनणार असल्याची खुशखबर सर्वांना दिली होती. त्यामुळे विराट कसोटी मालिकेदरम्यान पालकत्व रजा घेण्याची शक्यता आहे.
रोहितच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोणत्याच मालिकेसाठी रोहित शर्माचा भारतीय संघात दुखापतीमुळे समावेश करण्यात आला नव्हता. त्याला आयपीएलदरम्यान खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या ४ सामन्यांना मुकला होता. पण नंतर तो दुखापतीतून पुनरागमन करत मुंबई इंडियन्सकडून 2 सामने खेळला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाबरोबरच जाईल अशी चर्चा होती.
मात्र आता असे वृत्त समोर येत आहे की जोपर्यंत त्याच्या तंदुरुस्तीची खात्री भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी देत नाही तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाला जाता येणार नाही.
याबद्दल एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की ‘रोहित जोपर्यंत भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांच्या तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण होत नाही, तोपर्यंत तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही. जोपर्यंत पटेल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याला तंदुरुस्त घोषित करत नाही, तोपर्यंत रोहितला ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही.’
सुत्राने पुढे सांगितले, ‘असे असले तरी आमचा प्रयत्न असाच असेल की रोहित कसोटी मालिकेपर्यंत तंदुरुस्त व्हावा. कारण विराटने बीसीसीआयला तो वैयक्तिक कारणामुळे जास्तीत जास्त ३ कसोटी सामने मुकणार असल्याचे कळवले आहे.’
या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होईल. त्यानंतर ३ सामन्यांची टी२० मालिका होईल आणि शेवटी कसोटी मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ ११ किंवा १२ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे. तिथे त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर सामन्यांना सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
असा झाला दिल्ली कॅपिटल्सचा १३ वर्षांचा आयपीएलमधील प्रवास
पृथ्वी शॉने ‘ही’ गोष्ट केली तर सामना दिल्लीच्याच हातात येईल, दिग्गजाचा सल्ला
‘या’ खेळाडूची केएल राहुलच्या ऑरेंज कॅपवर नजर, तर रबाडा-बुमराहमध्ये पर्पल कॅपसाठी चूरस
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत