---Advertisement---

कोहलीचं ‘विराट’ मन! कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगला भारताच्या कर्णधाराकडून खास शुभेच्छा

On: बुधवार, जून 23, 2021 6:02 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येत आहे. गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा निकाल आज (२३ जून) लागणार आहे. तसेच हा सामना न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंगसाठी खूप खास आहे. कारण हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. अशातच भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग याचा हा कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. तो या ऐतिहासिक सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला राम राम ठोकणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघातील खेळाडू त्याचा हा सामना आठवणीतील सामना करण्यासाठी नक्कीच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.अशातच सहाव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी कर्णधार कोहलीने बीजे वॉटलिंग याला हात मिळवून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बीजे वॉटलिंग आणि विराट कोहली यांचा हात मिळवत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.(virat kohli congratulating bj watling on his last day of international cricket )

https://twitter.com/ICC/status/1407648510422523909?s=20

बीजे वॉटलिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
बीजे वॉटलिंगने न्यूझीलंड संघाकडून एकूण ७४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३७.८९ च्या सरासरीने ३७८९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ८ शतक आणि १९ अर्धशतक झळकावले आहेत. २०५ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

तसेच वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २८ सामने खेळले आहेत. यात त्याने २४.९१ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला ५ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. बीजे वॉटलिंगला टी-२० क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ५ सामने खेळले. यामध्ये त्याला अवघ्या ३८ धावा करता आल्या.

महत्वाच्या बातम्या – 

WTC Final, INDvsNZ Live: जेमिसनच्या आक्रमणानंतर जडेजा, पंतने सावरले; लंचब्रेकपर्यंत भारताकडे ९८ धावांची आघाडी

‘मिस्टर ३६०’ एबी डिविलियर्सने निवडला सार्वकालिन आयपीएल प्लेइंग इलेव्हन संघ; कर्णधारपदी ‘हा’ सर्वोत्तम खेळाडू

अजबच! केवळ २ धावांवर संघ झालाय ‘ऑलआऊट’, एकाही फलंदाजाने काढल्या नाहीत धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---