सिडनी | भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया देशात २ महिन्यांच्या दौऱ्यासाठी गेला आहे. संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यानंतर आता टीम इंडिया ६ डिसेंबरपासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे.
या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) एक खास विक्रम करण्याची संधी आहे. विराटने जर या मालिकेत २ शतकी खेळी केल्या तर त्याला सचिनच्या (Sachin Tendulkar ) ६ शतकांचा आॅस्ट्रेलियातील विक्रम मोडण्याची संधी आहे.
सचिनने १९९१ ते २०१२ या काळात आॅस्ट्रेलियात २० सामन्यात ५३.२०च्या सरासरीने १८०९ धावा केल्या होत्या. त्यात सचिनच्या ६ शतकी तर ७ अर्धशतकी खेळींचा समावेश होता.
विराटने २०११ पासून आतापर्यंत आॅस्ट्रेलियात ८ कसोटी सामन्यात ६२.००च्या सरासरीने ९९२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय खेळाडूंनी आॅस्ट्रेलियात केलेली कसोटी शतके-
६- सचिन तेंडूलकर, २० सामने
५- विराट कोहली, ८ सामने
५ सुनिल गावसकर, ११ सामने
४ व्हिव्हीएस लक्ष्मण, १५ सामने
महत्त्वाच्या बातम्या:
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील