नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.
याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीने अनेक खास विक्रम केले. त्यातील एक खास विक्रम म्हणजे त्याने यावर्षीही आंतरराष्ट्रीय सामन्यांत १००० धावांचा टप्पा पार केला आहे.
त्याने सलग ९व्या वर्षी १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. याबरोबर यावर्षी १००० हजार धावा करणारा तो चौथा खेळाडू ठरला.
यावर्षी ज्या ४ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामन्यांत १००० धावांचा टप्पा पार केला आहे त्यात विराट सोडला तर बाकी तीन खेळाडू इंग्लंडचे आहेत
जाॅनी बेअरस्ट्रो (१२२३), विराट कोहली (१०६५), जाॅश बटलर (१०३३) आणि जो रुट (१०३१) यांनी हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
इंग्लंडच्या तीनही खेळाडूंनी यासाठी २५ पेक्षा अधिक सामने खेळले आहेत तर विराटने केवळ १७ सामन्यात ही कामगिरी केली आहे.
१०६५ धावांपैकी २८६ धावा कसोटीत, ६३३ वनडेत तर १४६ टी२०मध्ये केल्या आहेत.
२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार धावा करणारे खेळाडू
१२२३- जाॅनी बेअरस्ट्रो, सामने- २६
१०६५- विराट कोहली, सामने- १७
१०३३- जाॅश बटलर, सामने- २६
१०३१- जो रुट, सामने- २५#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @HashTagMarathi— Sharad Bodage (@SharadBodage) July 13, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम
–भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही
–इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..
-रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला
–बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!