विराट कोहली एकवेळ फलंदाजीत फ्लॉप होऊ शकतो, मात्र तो आपल्या नृत्यानं चाहत्यांना कधीही निराश करत नाही. किंग कोहली अनेकदा सामन्यांमध्ये मैदानावर डान्स करताना दिसला आहे. कोहली अनेक वेळा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या गाण्यांवरही थिरकतो. मात्र यावेळी एक वेगळीच घटना घडली, जिचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे.
झालं असं की, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीदरम्यान स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांनी कोहलीसाठी गाणं गायलं. स्टँडमध्ये उपस्थित चाहते ‘माय नेम इज लखन’ हे गाणं गात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे गाणे ऐकून किंग कोहली स्वतःला थांबवू शकला नाही आणि तो लाइव्ह मॅचदरम्यान मैदानावर नाचू लागला. कोहलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Virat Kohli dancing when fans singing “My Name is Lakhan” song at Wankhede. 😀
– King Kohli, Absolute Blockbuster Character. ❤️pic.twitter.com/shPEX610Oi
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 1, 2024
मुंबई कसोटीतील विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, कोहली पहिल्या डावात केवळ 4 धावा करू शकला. तो रचिन रवींद्रच्या गोलंदाजीत धावबाद झाला. याआधी पुण्यात झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही कोहली पूर्णपणे फ्लॉप झाला होता. त्यानं सामन्याच्या दोन्ही डावात अनुक्रमे 1 आणि 17 धावा केल्या होत्या. आता चाहत्यांना या कसोटीत दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
मुंबई कसोटीत न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. किवी संघानं आपल्या पहिल्या डावात 235 धावा केल्या. संघाकडून डॅरिल मिशेलनं 82 आणि विल यंगनं 71 धावा केल्या, तर भारताकडून रवींद्र जडेजानं 5 आणि वॉशिंग्टन सुंदरनं 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 4 धावा करून रनआऊट झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं दोन बळी घेतले.
हेही वाचा –
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब
रोहित शर्माची पोकळी हा सलामीवीर कशी भरून काढणार? ऑस्ट्रेलियात होतोय पूर्णपणे फ्लॉप!