भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (india tour of South Africa) जोरदार प्रारंभ झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurian) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघातील खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहून भारतीय कर्णधार भलताच खुश झाला आहे. दरम्यान लाईव्ह सामन्यात तो मस्ती करताना दिसून आला आहे.
सेंच्युरियन कसोटीत पहिला दिवस (२६ डिसेंबर) भारतीय संघातील फलंदाजांच्या नावे राहिला. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३२७ धावांचा डोंगर उभारला. तर तिसऱ्या दिवशी देखील भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते.(Virat Kohli dance video went viral on social media)
सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात होते. त्यावेळी ड्रिंक्स ब्रेक झाला होता. ड्रिंक्स ब्रेक मध्येच विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो डान्स करताना दिसून आला होता. ब्रेक सुरू असताना स्टेडियममध्ये गाणं सुरू होतं. त्यावेळी विराट कोहली गाण्यावर ताल धरताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विराट कोहली आपल्या डान्ससाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. अनेकदा तो लाईव्ह सामन्यात मैदानावर डान्स करताना दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिका पार पडली होती. मुंबई कसोटीत तो ‘माय नेम इज लखन’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आला होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
Virat Kohli dancing to the tune. India is having a great day on field ❤😻🥳🥳…
~Virat and his dance steps are pure bliss to watch 😁❤️@imVkohli pic.twitter.com/ZocAuhYw3y
— viratfangirl (@LavanyaJessy) December 28, 2021
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२७ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १९७ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाला १ बाद १६ धावा करण्यात यश आले आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात १४६ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
वयाची तिशी ओलाडली तरी भेदकता तीच! बॉक्सिंग डे कसोटीत ‘पंचक’ घेत शमी याबाबतीत बनला नंबर १
बधाई हो! इरफान दुसऱ्यांदा बनला पिता; ट्विट करत दिली माहिती
हे नक्की पाहा :