---Advertisement---

विराटचा बॉलिवूड अंदाज! शाहरुखसोबत ‘पठाण’ गाण्यावर धरला ठेका, पहा VIDEO

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 18 वा हंगाम शनिवारी ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये शानदार उद्घाटन समारंभाने सुरू झाला. बॉलिवूडचा रंगतदार तडका आणि क्रिकेटच्या उत्सहात रंगलेल्या या सोहळ्यात अभिनेता शाहरुख खान आणि विराट कोहली यांचा डान्स विशेष आकर्षण ठरला.

उद्घाटन समारंभात अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल आणि पंजाबी गायक करण औजला यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी केकेआरचा सहमालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननेही व्यासपीठावर हजेरी लावली. त्याने खेळाडूंशी संवाद साधत आपल्या खास शैलीत नृत्यही केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फलंदाज विराट कोहली आणि शाहरुख खान यांनी ‘झूमे जो पठाण’ या गाण्यावर एकत्र नृत्य केले. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी शाहरुखने केकेआरच्या रिंकू सिंगसोबतही ‘लुट पुट गया’ गाण्यावर नृत्य केले.

पाहा व्हिडिओ-

उद्घाटन समारंभात बीसीसीआयने विराट कोहलीला खास मोमेंटो प्रदान केला, ज्यावर ‘IPL 18’ असे कोरले होते. कोहली हा 2008 पासून एकाच संघासाठी सलग 18 हंगाम खेळणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात गतविजेते केकेआर आणि आरसीबी आमनेसामने आहेत. आरसीबीच्या नव्या कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात फाफ डू प्लेसिसऐवजी पाटीदार, तर श्रेयस अय्यरऐवजी अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---