आयपीएल 2024 मध्ये बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी (दि. 15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. हा सामना सनरायझर्स संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करत आपल्या खिशात टाकला. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ मात्र आता जोरात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे आरसीबीचा प्रमुख खेळाडू असलेला आणि करोडो क्रिकेट रसिकांचा जीव की प्राण असलेल्या विराट कोहलीचा. स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाने त्याच्या मोबाईलमध्ये शूट केलेला विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होतोय.
सदर व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, विराट हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करतोय. तेव्हा स्टँडमधून ‘चिकू चिकू’ म्हणत चाहते त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या माहितीये की चिकू हे विराटचे टोपणनाव आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहखेळाडू देखील विराटला याच नावाने हाक मारायचे. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा सामन्यात विराटला चिकू म्हणून हाक मारायला सुरुवात केली. ( Virat Kohli Dancing On Chiku Chants While Fielding Rcb Vs Srh Match Watch Video )
पूर्वी अनेकदा विराट या बोलण्याने चिडायचा. परंतू, या व्हिडिओत आपण पाहू शकतो की विराट प्रेक्षकांच्या या वागण्याने न चिडता हे सगळं मस्करीत घेतोय. उलट चाहत्यांसह मजा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये विराट ‘चिकू चिकू’ च्या घोषणांना ठुमके मारून नाचून उत्तर देतोय. हे पाहून चाहते तर खुश झालेतच पण विराटला सुद्धा हसू आवरत नाही. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
Wait for his reaction 😹❤️pic.twitter.com/muLIiHN52Z
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 16, 2024