---Advertisement---

धोनीच्या विजयी फटक्यानंतर विराटने लिहिलेले पहिले ट्वीट केले डिलीट, ‘हे’ होते त्यामागील कारण

On: सोमवार, ऑक्टोबर 11, 2021 10:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये महेंद्रसिंग धोनीने चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चार गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह सीएसकेने आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले आहे. धोनीने विजयी फटका मारला आणि थोड्याच वेळात विराट कोहलीने एक ट्विट केले, जे खूप व्हायरल झाले होते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराटने धोनीचे कौतुक करणारे एक ट्विट लिहिले, पण नंतर काही मिनिटांतच त्याने ते हटवले होते. त्यानंतर विराटने पुन्हा काही वेळात धोनीचे कौतुक करत एक ट्विट केले.

विराटने पहिल्यांदा ट्विटरवर लिहिले, ‘अँड किंग इज बॅक, क्रिकेटचा सर्वोत्तम फिनिशर, आज रात्री तू मला माझ्या खुर्चीवरून उडी मारायला भाग पाडले.’ विराट या ट्विटमध्ये लिहायला विसरला की ‘आजपर्यंतचा क्रिकेटचा सर्वात मोठा फिनिशर’ त्यामुळे त्याने हे ट्वीट डिलीट केले आणि नंतर चूक सुधारून त्याने त्याचे सुधारीत ट्वीट केले. विराटचे हे ट्विट खूप व्हायरल झाले आहे आणि चार लाखपेक्षा जास्त लोकांना ते आवडले आहे.

https://twitter.com/imVkohli/status/1447265301934993413

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मैदानावरील आणि मैदानाबाहेरील संबंध नेहमीच उत्तम राहिले आहेत. विराटने धोनीच्या नेतृत्वाखाली आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती आणि धोनीनंतर विराटने भारतीय संघाचे नेतृत्व केले. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना विराटच्या नेतृत्वाखाली खेळला. विराट अनेक वेळा म्हणाला आहे की धोनी नेहमीच त्याचा कर्णधार राहील.

https://twitter.com/perumalkrish/status/1447373257150119939

पहिल्या क्लालिफायर सामन्यात धोनी चेन्नईला ११ चेंडूत २४ धावांची गरज असताना मैदानात आला होता. त्याने यावेळी ६ चेंडूच १ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद १८ धावांची खेळी केली. यासह त्याने चेन्नईला विजय मिळवून दिला.

चेन्नई संघ आता अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील प्लेऑफच्या सामन्यातील विजेता संघ दिल्ली कॅपिटल्सशी लढेल आणि या सामन्यातील विजेता संघ चेन्नईशी अंतिम सामन्यात लढेल. अंतिम सामन्यानंतर आयपीएल २०२१ चा विजेता ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऋतुराजही झाला ‘थाला’ धोनीचा फॅन, म्हणाला, ‘मला त्याच्याकडून खूप शिकायचंय’

हॅलो जी! धोनीच्या ‘विंटेज’ खेळीनंतर व्हायरल झाल्या मजेदार मीम्स

धोनीच्या चेन्नईने पालटवली बाजी, नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करण्यामागेची जाणून घ्या ६ कारणं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---