आज भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. भारतीय संघाची ही घोडदौड विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सुरु आहे तर त्याच संघात भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.
जर बारकाईने यांच्या कामगिरीकडे लक्ष दिले तर दोघांच्या कर्णधार म्ह्णून केलेल्या कामगिरीत आपल्याला बराच सारखेपणा दिसेल. पाहूया काय आहे तो सारखेपणा
#१ विराटची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च आहे १८३ तर एमएस धोनीचाही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च आहे १८३
#२ धावांचा पाठलाग करताना एमएस धोनीची सरासरी आहे ९७.३६ तर विराटची आहे ९५.२०
#३ धोनी कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचला होता आणि अंतिम फेरीत विरोधी संघ होता पाकिस्तान. विराटही त्याच्या कर्णधार म्हणून पहिल्याच आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचला आहे आणि अंतिम फेरीत विरोधी संघ आहे पाकिस्तान.
#४ धोनी २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना इंग्लंड देशात खेळाला होता. विराटही २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना इंग्लंड देशात खेळत आहे.
#५ धोनीच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू चमकला आहे तर विराटच्या नेतृत्वाखालील पहिलच्याच आयसीसीच्या स्पर्धेत युवराज चांगली कामगिरी करत आहे.