इंग्लंड आणि भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली होती. परंतु तो मोठी खेळण्यास अपयशी ठरला होता. तसेच अनेक डाव उलटून गेले तरीदेखील त्याला शतक झळकावता आले नाहीये. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आता विराटचा बचाव करण्यासाठी पुढे आला आहे. तसेच त्याने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत विराट आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. त्याला केवळ एकच वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले आहे. तो सतत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होतोय. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सल्ला देत म्हटले होते की, “विराटने सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनीच्या मैदानावर खेळलेल्या २०० धावांच्या खेळीतून काहीतरी शिकायला हवे. त्यावेळी सचिनने एकही ड्राइव्ह शॉट खेळला नव्हता.”
सोनीद्वारा आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चा सत्रात माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराला विचारण्यात आले होते की, सुनील गावसकरांनी विराटला दिलेला सल्ला योग्य आहे का? यावर उत्तर देताना आशिष नेहरा म्हणाला होता की, “सर्वात पहिली गोष्ट, विराटसारख्या खेळाडूला आपला खेळ कसा आहे? हे माहीत असते. तो प्रत्येक परिस्थितीत यशस्वी ठरला आहे आणि इंग्लिश परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, प्रत्येकाला माहीत आहे. हे सोपे नसते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्ही आता सुनील गावसकरांचे वक्तव्य सांगितले. हा, जर विराटसारख्या खेळाडूला असं काही करायची आवश्यकता असेल तर तो नक्कीच असे करण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही इथे असाही उल्लेख केला की, विराट स्लीपमध्ये झेलबाद होतोय. परंतु दरवेळी तो ड्राइव्ह करताना बाद झाला नाहीये. याच अर्थ असा नाही की, तो चेंडू कव्हर ड्राईव्ह करण्यासाठी नाही. तरीदेखील तो कव्हर ड्राईव्ह करण्यासाठी जात आहे.”(Virat Kohli don’t need to change his technique overnight says Ashish Nehra)
तसेच विराटचा बचाव करत तो पुढे म्हणाला की, “विराट सारख्या खेळाडूला रातोरात आपल्या फलंदाजी तंत्रात बदल करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूसाठी अचानक त्याच्या खेळाला समायोजित करणे आणि मानसिकरित्या सृदृढ होण्याच्या दृष्टीने हे खूप अति आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पलटवार करण्यास सज्ज, इंग्लंडच्या गोलंदाजांचे सगळे नुसके फेल ठरवण्यासाठी मिळालाय ‘हा’ कानमंत्र
हसला, भोवती चक्कर मारली, खूप उकसावलं; मग पोलार्डने केलं असं काही की पाकिस्तान गोलंदाज निरुत्तर