भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून बॅटने चमत्कार करू शकलेला नाही. आयपीएलमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही विराटला काही विशेष करता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० मध्ये (IND vs ENG) त्याची बॅट शांत राहिली. हुड्डा सातत्यपूर्ण फलंदाजी करत होता, मात्र तरीही हुड्डाला बाहेर बसवत विराटला संधी देण्यात आली होती. पण आता मात्र, विराट क्षेत्ररक्षणातही फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात विराटने लियाम लिव्हिंगस्टोनचा एक सोपा झेल सोडल्याने त्याला ट्रोल केले जात आहे.
सोपा झेल सोडला
विराट कोहलीची गणना सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्याच्या १८व्या षटकात एक सोपा झेल सोडला. हर्षल पटेलच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही आणि डीप मिड-विकेटच्या दिशेने गेला. तिथे विराट कोहली क्षेत्ररक्षण करत होता. हा त्याच्यासाठी सोपा झेल होता, पण चेंडू कोहलीच्या हातात आल्यानंतर बाहेर गेला. त्यावर भारताचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्राने कोहलीची पाठराखण करणारे ट्वीट शेअर केले आहे.
Never saw Virat Kohli dropping a catch even in the nets. He is a class player and today or tomorrow his form will return. He should not take this added pressure. #EngvsInd pic.twitter.com/YjeIJx2GlQ
— Amit Mishra (@MishiAmit) July 10, 2022
भारतीय संघाचे नुकसान झाले नाही
मात्र, लियाम लिव्हिंगस्टोनचा झेल सुटल्याने भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले नाही. ज्यावेळी त्याचा झेल सोडण्यात आला त्यावेळी तो २५ चेंडूत ३६ धावा करत खेळत आहे. डावाच्या शेवटी तो २९ चेंडूत ४२ धावा करून नाबाद राहिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या. भारताला विजयासाठी २१६ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते. यापूर्वी दोन सामन्यांत इंग्लिश फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले होते.
भुवी-बुमराहला विश्रांती द्यावी लागली
या सामन्यात भारतीय संघाने आपले दोन प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली होती. उमरान मलिकला संधी मिळाली आणि त्याने ४ षटकांत ५६ धावा दिल्या. आवेश खानने ४३ आणि रवींद्र जडेजाने ४५ धावा दिल्या. यामुळेच इंग्लंड संघाने २१५ धावांपर्यंत मजल मारली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सेहवाग-सचिनने जी कामगिरी कसोटी-वनडेत केली, तसाच कारनामा सूर्यकुमारने टी२०त केलाय
टी२०मध्ये शंभरी करण्यात भारताचेच खेळाडू वरचढ, पाहा किती केली शतके
टीम इंडियाला चियर करताना दिसला कॅप्टनकूल, शास्त्रींबरोबरचा फोटो आला चर्चेत