---Advertisement---

मन जिंकलस भावा! विराट कोहलीची आपुलकी कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जून 30, 2022 5:20 PM
Virat-Kohli-Cameraman
---Advertisement---

विराट कोहली मैदानावरील नेतृत्वासाठी ओळखला जातो. मग ती फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. कर्णधारपद सोडल्यानंतरही विराटच्या शैलीत बदल झालेला नाही. काही काळापूर्वी कोहली इंग्लंडमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी किंग कोहली पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीत दिसला आहे.

अलीकडेच, विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये कोहली त्याचा सहकारी शुभमन गिलसोबत दिसत आहे. सराव सत्रानंतर बोलत असताना दोन्ही खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात आहेत. एक कॅमेरामनही त्याच्या मागे सतत चालत असतो. कोहली शुभमनला फॉलो करतो आणि मग अचानक विराट कॅमेरामनकडे बघण्यासाठी थांबतो आणि हसतो आणि विचारतो ‘काय चालले आहे?’ हा ७५ सेकंदांचा व्हिडिओ एजबॅस्टन ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘किंग कोहली सोबत चालताना, माझे आयुष्य सफल झाले.’

दरम्यान, भारत १ जुलैपासून इंग्लंडसोबत कसोटी सामना खेळणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळवला जाईल, जो गेल्या वर्षी दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेचा भाग आहे. गेल्या वर्षी या मालिकेत ४ कसोटी सामने खेळले गेले आहेत ज्यात भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता, तर जो रुट इंग्लंडचा कर्णधार होता. यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लिश संघाचा कर्णधार असेल.

२-१ ने आघाडी घेतल्याने भारतीय संघाला इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी असेल. असे झाल्यास भारतीय संघाला १५ वर्षांत प्रथमच इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी मिळेल. यापूर्वी २००७ मध्ये भारतीय संघाने हा पराक्रम केला होता. त्यावेळी राहुल द्रविड संघाचा कर्णधार होता. यावेळी द्रविड भारतीय संघाशी प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

इंग्लंडविरुद्ध कोहली करू शकतो ‘विराट’ खेळी, सराव सत्रात मिळाले स्पेशल संकेत

भारतासाठी धोक्याची घंटा! बहुप्रतिक्षित पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

भारताने दिलेली जखम आफ्रिकेच्या जिव्हारी, इंग्लंड दौऱ्यापूर्वी लागला मोठा झटका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---