---Advertisement---

…आणि विराटने केली सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी…

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 1:15 PM
---Advertisement---

हॅमिल्टन । आज (5 फेब्रुवारी) सेडन पार्क (Seddon Park) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात द्विपक्षीय वनडे मालिकेतील पहिला सामना (1st ODI Match) पार पडत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडसमोर 348 धावांचे आव्हान उभे केले आहे.

तसेच या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक खास विक्रम केला आहे. विराटने या सामन्यात 63 चेंडूत 51 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 चौकारांचा समावेश आहे.

विराटची वनडेमधील न्यूझीलंड विरुद्ध 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही 13 वी वेळ आहे. त्यामुळे त्याने भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिननेही न्यूझीलंडविरुद्ध वनडेत 13 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

आज न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 347 धावा केल्या आहेत. भारताकडून विराट बरोबरच श्रेयस अय्यरने 103 धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे कारकिर्दीतील पहिले शतक आहे. तसेच केएल राहुलने नाबाद 88 धावांची खेळी केली.

वनडेमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

13 – सचिन तेंडुलकर

13 – विराट कोहली

9 – सौरव गांगुली

9 – विरेंद्र सेहवाग

8 – मोहम्मद अझरूद्दीन

https://twitter.com/Maha_Sports/status/1224698739169755136

https://twitter.com/Maha_Sports/status/1224684428082855937

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---